पुणे School Girl Sexual Abuse : राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. बदलापूरच्या घटनेमुळं संपूर्ण देश हादरलेला असताना राज्यातील विविध भागांमधून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशीच घटना घडल्याचं समोर आलय. दोन वर्षांपूर्वी नात्यातील एका तरुणानं 14 वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचं उघडकीस आलय. मुलीच्या आईनं केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत 21 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार दोन वर्षांपूर्वी घडलाय. त्यावेळी पीडित मुलगी ही इयत्ता सहावीमध्ये शिकत होती. आरोपी तरुणानं पीडित मुलीच्या दंडावर इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. एवढंच नाही तर हे करत असताना आरोपीनं फोटो देखील काढले. त्यानंतर यासंदर्भात कोणाला सांगितलं तर फोटो व्हायरल करण्याची धमकी त्यानं मुलीला दिली.
'गुड टच बॅड टच' उपक्रमामुळं अत्याचाराला वाचा : पीडित मुलगी ज्या शाळेत शिक्षण घेते त्या शाळेत काही दिवसांपूर्वी 'गुड टच बॅड टच' उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमामुळं पीडित मुलीला काहीसा धीर आला आणि तिनं तिच्या शिक्षकांना तिच्यासोबत दोन वर्षांपूर्वी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर याची दखल घेत शिक्षकांनी मुलीच्या कुटुंबीयांना बोलावून यासंदर्भातील माहिती दिली. याप्रकरणी तरुणीच्या आईनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी तरुणाला अटक करण्यात आली. तर या सर्व घटनेचा तपास बंडगार्डन पोलीस करत असल्याची माहिती डीसीपी स्मार्थना पाटील यांनी दिली.
हेही वाचा -
- भय इथलं संपलं नाही! मुंबईत अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम अटकेत - Girl Sexually Abuse Kandivali
- अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक नाही? - minor girl abuse cases
- रुग्णालयाच्या आवारात दिव्यांग बालिकेचा विनयभंग; संपकरी डॉक्टरांनी नराधमाला चोपलं - Girl Abused In Thane