ETV Bharat / state

मुसळधार पावसाचा नागपूरला फटका : दोघांचा मृत्यू, बालक अजूनही बेपत्ता; आज मुसळधार पावसाचा इशारा, शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर - Heavy Rain Hit To Nagpur

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 9:08 AM IST

Updated : Jul 22, 2024, 10:26 AM IST

Heavy Rain Hit To Nagpur : नागपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. पावसाच्या पाण्यामुळे नागपुरातील तीन व्यक्ती वाहून गेल्या आहेत. त्यातील दोन जणांचे मृतदेह सापडले असून एका बालकाचा सध्या शोध घेण्यात येत आहे. दरम्यान आज नागपूरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.

Heavy Rain Hit To Nagpur
मुसळधार पावसाचा मोठा तडाखा (Reporter)
मुसळधार पावसाचा नागपूरला फटका (Reporter)

नागपूर Heavy Rain Hit To Nagpur : नागपूर शहरात आणि जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एक बालक अद्यापही बेपत्ता आहे. भरतवाडा, पूनापूर आणि सोमलवाडा इथल्या तलाठ्यांच्या प्राथमिक चौकशी अहवालात ही माहिती उघड झाली आहे. श्यामनगर पुनापूर भागातील भोजराज बुलीचंद पटले (52) हे नाल्याच्या बाजूनं उभे असताना अचानक त्यांचा पाय घसरुन ते पाण्याच्या प्रवाहानं वाहत गेले. त्यांचा मृतदेह सापडला असून मेयो हॉस्पीटल इथं पाठवण्यात आलाय याशिवाय बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत नरेंद्र नगर भागातील सुधा विश्वेश्वरराव वेरुळकर (85) या बेलतरोडी ते बेसा लगतच्या नाल्याचा पूर पाहण्यासाठी गेल्या असता, पाण्याच्या प्रवाहानं वाहून गेल्या. रविवारी त्यांचा मृतदेह श्यामनगर परिसरातील नाल्यात आढळून आला आहे.

Heavy Rain Hit To Nagpur
मुसळधार पाऊस (Reporter)

मुलाचा मृतदेह शोधण्याचं काम सुरू : भरतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनबाबा नगर इथला रहिवासी श्रावण विजय तुलसिकर (12) हा बालक नाल्याच्या बाजूनं खेळत होता. यावेळी आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात तो वाहत गेला. या मुलाचा मृतदेह अजूनपर्यंत सापडलेला नाही. प्रशासनाकडून त्याचा मृतदेह शोधण्याचं काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Heavy Rain Hit To Nagpur
मुसळधार पाऊस (Reporter)

आज नागपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या पूर्वसूचनेनुसार नागपूर जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. नागपूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला आहे. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अतिमुसळधार पाऊस पडल्यास नागपूर जिल्ह्यात अनेक भागात अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील रस्ते मार्ग पुराच्या पाण्यानं प्रभावीत झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थाना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयं आणि कोचिंग क्लासेस यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण नागपूर जिल्हा सीमा क्षेत्रामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Heavy Rain Hit To Nagpur
मुसळधार पाऊस (Reporter)

हेही वाचा :

  1. चंद्रपुरात पुराचा हाहाकार; चिचपल्लीतील मामा तलाव फुटल्यानं तीनशे घरात पाणी; रेड अलर्टमुळे शाळांना सुट्टी - Heavy Rain Hit To Chandrapur
  2. राज्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस! 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट - Maharashtra Weather Update
  3. गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; पर्लकोटा नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला - Gadchiroli Rain

Last Updated : Jul 22, 2024, 10:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.