ETV Bharat / state

सध्या काँग्रेस हाऊसफुल, मात्र कोणी आले तर त्यांचं...; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटलांचे मोठं वक्तव्य - Satej Patil

Satej Patil : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे सुरु झाले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटप सुरु झालं आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसमधील पक्ष प्रवेशबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Satej Patil
आमदार सतेज पाटील (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 10:52 PM IST

कोल्हापूर Satej Patil : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election 2024) सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसलीय. राज्यात सर्वत्र इनकमिंग सुरू आहे. मात्र, सध्या काँग्रेस भरगच्च भरली असून काँग्रेस सध्या हाऊसफुल आहे. परंतु कोणी आलं तर त्यांचं स्वागतच आहे. जागा वाटपाचे चर्चा सध्या सुरू आहे. एखादी जागा इकडं तिकडं होईल मात्र यावेळी उमेदवार मध्ये देखील अदला बदली होईल. आम्हाला कोल्हापूरमध्ये किती जागा हवे आहेत हे जाहीरपणे मी बैठकीत बोललेलो आहे. आताच उघडपणे बोलणं संयुक्त नाही. असं आमदार सतेज पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीचा जाहीरनामा : पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समिती करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रत्येक पक्षातील दोन-तीन लोक कार्यरत आहेत. सध्या प्राथमिक दृष्ट्या काही मुद्दे काढले आहेत. मात्र शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मान्यता आली की, महाविकास आघाडीचा जाहीरनामा राज्यातील जनतेसमोर येईल असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील (ETV Bharat Reporter)

राहुल गांधी यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्याचा होणार अनावरण : राज्याच्या विधानसभा निवडणुकीला आता काही दिवसांचा अवधी राहिल्यानं राजकीय पक्षांची लगबग सुरू झालीय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. राहुल गांधींच्या उपस्थितीत कसबा बावड्यातील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. तसेच ते संविधान न्याय संमेलनाला गांधी उपस्थिती लावणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

राहुल गांधी करणार अभिवादन : काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज यांनी तयारीचा आढावा घेतला. 5 ऑक्टोबरला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती समाधी स्थळावर राहुल गांधी अभिवादन करणार आहेत. संविधान न्याय संमेलनाला ते उपस्थित राहणार असून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तर कसबा बावडा येथील प्रायव्हिलियन ग्राउंड येथे 2001 कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपात 1000 कलाकार स्टेजवर आपले कला सादर करणार आहे.

बहुशस्त्री असणारी राज्यातील पहिली मूर्ती : मालवण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना अद्याप ताजी असतानाच, कोल्हापुरात राहुल गांधी यांच्याहस्ते नवीन पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुतळ्याची काळजी कशी घेतली गेली या संदर्भात सतेज पाटील म्हणाले, की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेतलेली आहे. ही मूर्ती तयार करायला आम्हाला एक वर्ष लागलेला आहे. ही मूर्ती बहुशस्त्री असणारे आहे. सर्व शस्त्र असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ही राज्यातील पहिली मूर्ती आहे. हा पुतळा तयार करताना सर्व इतिहासकारांच मार्गदर्शन घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत नियोजनबध्द 18 ते 19 फूट उंच अशी ही मूर्ती तयार करण्यात आली असल्याचं माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १ ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर; राज्यातील विधानसभा जागांचा आढावा घेणार - Amit Shah Mumbai Visit
  2. उद्धव ठाकरे यांची अवस्था केविलवाणी; त्यांनी एका जागेवर तरी निवडून येऊन दाखवावं; बावनकुळे यांचं आव्हान - Chandrashekhar Bawankule
  3. ख्रिश्चन समाजाला हवंय स्वतंत्र 'आर्थिक विकास महामंडळ', ख्रिश्चन समाजाची सरकारवर नाराजी - Christian Arthik Vikas Mahamandal

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.