ETV Bharat / state

"लाडकी बहीण, भाऊनंतर आता 'लाडका पूरग्रस्त' विसरू नये"; आमदार सतेज पाटलांचा राज्य सरकारला चिमटा - Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील विविध भागात आलेल्या पुराची आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी चर्चा करून दिलासा दिला. तसेच राज्यात सुरू केलेल्या 'लाडकी बहीण, लाडका भाऊ' योजनेवरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

Majhi Ladki Bahin Yojana
एकनाथ शिंदे आणि सतेज पाटील (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 4:46 PM IST

कोल्हापूर Majhi Ladki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनांचा बोलबाला सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात पूरस्थिती असल्यानं राज्य सरकारनं लाडका पूरग्रस्तला विसरू नये असा चिमटा आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारला काढला आहे. कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात कोवाड येथे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली पूर आलेल्या भागाची पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार पाटील पत्रकारांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना सतेज पाटील (ETV BHARAT Reporter)

जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून मोठं नुकसान पूरग्रस्तांना सहन करावं लागलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरचा दुर्गम भाग असलेल्या चंदगड तालुक्यातील कोवाड गावात ताम्रपर्णी नदीचं पाणी आलेल्या भागाची पाहणी केली.

केवळ 30 टक्के पूरग्रस्त भागाचे पंचनामे : यावेळी नदी पात्रात केलेले अतिक्रमण काढले पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार शाहू महाराज यांनी दिली. तर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर असताना प्रशासन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यात गुंतले आहे. जिल्ह्यातील अवघ्या 30 टक्के पूरग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात आले आहेत. यावरून आमदार सतेज पाटलांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावलं आहे.

पंचगंगा पाणी पातळीत घट : शनिवारी पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांहून अधिक होती. मात्र, आज सकाळी राधानगरी धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत घेतल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होत आहे. दुपारी तीन वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगा नदीची पाणी पातळी 5 इंचाने घटली. सध्या पंचगंगा 47 फूट 3 इंचावरून वाहत आहे. अजूनही कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर, सुतार वाडा, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प या परिसरातील घरांमध्ये पुराचे पाणी असल्यानं या ठिकाणच्या नागरिकांनी महापालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या निवारण केंद्रात आसरा घेतला आहे. मात्र, पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यानं कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -

  1. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठी पैसा आहे का? अजित पवारांनी थेटच सांगितलं - Majhi Ladki Bahin Yojana
  2. 'लाडकी बहीण' योजनेमुळं सावत्र भावाच्या पोटात दुखू लागलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला - Majhi ladki Bahin Yojana
  3. अमरावतीत लाडकी बहीण योजनेसाठी खास मदत कक्ष; अडचणी असल्यास बिनधास्त करा 'या' नंबरवर कॉल - Majhi ladki Bahin Yojana

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.