ETV Bharat / state

औरंगजेब आणि मोदी दोघेही एकाच मातीतले; खासदार संजय राऊत यांची टीका - Lok Sabha Election 2024

Sanjay Raut on PM Narendra Modi : औरंगजेबप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्रावर चाल करून येण्याची भाषा करत आहेत. खरंतर मोदी आणि शाह हे दोघेही मोघलांसारखे वागत आहेत. त्यांच्या अशा वागण्यामागे इतिहास आहे. महाराष्ट्रावर चाल करून आलेला औरंगजेब याचा जन्म गुजरातच्या मातीतला आहे. याच गुजरातच्या मातीत नरेंद्र मोदी यांचाही जन्म झाला. यामुळे औरंगजेबाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राच्या विरोधात नरेंद्र मोदी असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अमरावती शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना केला आहे.

Sanjay Raut Criticizes Modi
संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 4:40 PM IST

Updated : Apr 18, 2024, 5:39 PM IST

संजय राऊत हे मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करताना

अमरावती Sanjay Raut on PM Narendra Modi : अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्याला महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे, काँग्रेसच्या माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार अनंत गुडे प्रामुख्याने उपस्थित होते.

फडणवीसांना उगाच मोठं करतोय : मोदी म्हणतात एक अकेला सबपे भारी. मग त्यांनी इतर पक्षातील लोकं का फोडले हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, मनोहर जोशी, शरद पवार यांसारखे अतिशय मोठ्या उंचीचे मुख्यमंत्री लाभलेत. या सर्व मुख्यमंत्र्यांचे कर्तृत्व फार मोठे आहे आणि देवेंद्र फडणवीस मी दोन पक्षांना फोडून आलो असे मोठ्या अभिमानाने सांगतात. दोन पक्ष फोडणे हेच त्यांचे कर्तृत्व आहे. खरंतर फडणवीस यांना नागपूर बाहेर कोणीही विचारत नाही. आपणच का म्हणून त्यांना मोठं करीत आहोत? असा सवाल देखील खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्राची : अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा विरुद्ध आमचे उमेदवार बळवंत वानखडे यांची लढाई नाही. तर ही लढाई आहे मोदी विरुद्ध महाराष्ट्राची. ही लढाई आहे मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आणि मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही लढाई असल्याचं देखील खासदार संजय राऊत यांनी मेळाव्याला संबंधित करताना स्पष्ट केलं.

शिवसेनेनेच दिले भाजपाला बळ : महाराष्ट्रात साधी पोस्टर लावायला देखील भाजपा जवळ माणसं नव्हती. त्या काळात मी स्वतः भाजपाला विरोध केला होता; मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी भाजपाला साथ द्या, असे आदेश दिल्यामुळे आम्ही बाळासाहेबांचा आदेश पाळला. आता मात्र या भाजपाला महाराष्ट्रातून कायम हद्दपार करण्यासाठी अमरावतीतलेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी सज्ज होण्याची आणि कामाला लागण्याची गरज असल्याचे देखील खासदार संजय राऊत म्हणाले.

छाती 56 इंचाची नव्हे तो मातीचा खोका : आपली छाती 56 इंचाची आहे, असं गर्वाने सांगणारे नरेंद्र मोदी हे मणिपूर प्रकरणात गप्प बसतात. लडाखमध्ये चीनने आपली जमीन बळकावली. अशा परिस्थितीत चीनला आपली 56 इंचाची छाती दाखवण्याची हिंमत नरेंद्र मोदी करीत नाहीत. केवळ महाराष्ट्रात 56 इंचाची छाती दाखवणाऱ्या नरेंद्र मोदी यांची छाती ही 56 इंचाची नव्हे तर मातीचा रिकामा खोका असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचा अपमान : मातोश्री हे आमचे मंदिर आहे. मातोश्रीला कधीही खोटारडेपणा मान्य नव्हता. अमित शाह हे मातोश्रीवर येऊन खोटे बोलले म्हणून आम्ही भाजपाची साथ सोडली आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शाह यांच्या बंगल्याच्या बाहेरील हिरवळीवर रुमाल टाकून त्यांची आठ तास वाट पाहतात. इतका वेळ थांबून आज भेट होणार नाही उद्या या असे त्यांना सांगितले जाते. पूर्वी मातोश्रीवर येणारे हे लोक आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फिरवत आहे. खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वतःसह संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचं देखील खासदार संजय राऊत म्हणाले.

बाईच्या मोहाला बळी पडू नका : नवनीत राणा यांच्या बोलण्याला, रूपाला आणि कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका, असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिला. आपली सर्वांची बाळासाहेबांवर निष्ठा आहे. बाळासाहेबांचा आदेश म्हणून मातोश्रीचा अवमान करणाऱ्या नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी शिवसैनिकांनी ताकदीने कामाला लागण्याचे आवाहन देखील खासदार संजय राऊत यांनी केले.

हेही वाचा :

  1. दहशत निर्माण करण्यासाठी सलमानच्या घरावर गोळीबार, बिहारमध्येच रचला होता गोळीबाराचा कट; चौकशीत धक्कादायक खुलासे - Salman Khan House Firing
  2. कर्नाटकच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; क्रूझर ट्रॅव्हल्सवर आदळून 5 जण ठार, तर 15 जण जखमी - Sangli Road Accident
  3. शिल्पा शेट्टीला धक्का : राज कुंद्रा मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीनं इतक्या कोटींची संपत्ती केली जप्त - ED Attached Shilpa Shetty Property

Last Updated : Apr 18, 2024, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.