ETV Bharat / state

पंतप्रधान मोदींना मणिपूरमधील हिंसाचार थांबवता येत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Attack On Pm Modi - SANJAY RAUT ATTACK ON PM MODI

Sanjay Raut Attack On Pm Modi : उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूर हिंसाचारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यावेळी संजय राऊत यांनी नागपूर कार अपघातावरुन उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावही टीका केली. संकेत बावनकुळे हा सुटतो कसा, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Sanjay Raut Attack On Pm Modi
खासदार संजय राऊत (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2024, 10:19 AM IST

Updated : Sep 11, 2024, 2:40 PM IST

मुंबई Sanjay Raut Attack On Pm Modi : मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. मात्र पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना मणिपूरमधील हिंसाचार थांबवता येत नाही. पंतप्रधान मोदींना मणिपूर हातचं घालवायचं आहे. मणिपीरप पेटत असताना राष्ट्रीय सल्लागार कुठ आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी आज मुंबईत बोलताना केला. नागपूर कार अपघातावरुन संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. सलमान, संकेत बावनकुळे सुटतो कसा, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मणिपूरमध्ये जा नाहीतर राजीनामा द्या : खासदार संजय राऊत म्हणाले की, मणिपूर हा या हिंदुस्तानचा एक महत्त्वाचा भाग आहे. गेल्या अडीच वर्षापासून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे स्वतःला विश्वगुरू मानतात जे रशिया युक्रेन युद्ध मिटवण्यासाठी प्रत्यक्ष ते युद्धभूमीवर जातात. पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष युद्धभूमीवर गेल्याचं अंधभक्त सांगतात. मोदी युद्धभूमीवर आहेत म्हणून चार तास रशिया युक्रेनवर हल्ला करणार नाही असे, ढोल वाजवतात. पंतप्रधान मोदी पुतीन बरोबर चहा पितात, अन् मग झेलेन्सकीला भेटतात, युद्धबंदीवर चर्चा करतात, असं म्हणून त्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. मात्र या नेत्याला आमच्या देशातील मणिपूरमधील अत्याचार थांबवता येत नसून हे त्यांचे अपयश आहे, ते त्यांनी स्वीकारलं पाहिजे," असं देखील राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांच्या नाकासमोर अपघात झाला : नागपुरातील कार अपघाताबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "फडणवीसांच्या नाकासमोर अपघात झाला, अपघातातील सतरा अठरा जखमी हॉस्पिटलमध्ये आहेत. ज्यांच्या नावावर गाडी त्याचं एफआयआरमध्ये नाव नाही. कसं तुम्ही कायदा सुव्यवस्थेच्या चर्चा करताय. त्या गाडीत लाहोरी बारच बिल आढळून आले असून त्यात खाण्यापिण्याच्या पदार्थांचं बिल आहे. कायद्याचे रक्षण करणारे पोलीस विभागाच्या रश्मी शुक्ला यांनी सदर बिल समोर आणलं पाहिजे. आम्हाला हिंदुत्व शिकवतात, दारू चिकन मटन यासोबतच बीफ कटलेटचे देखील बिल आहे. श्रावण, गणपती काळात आम्हाला हिंदुत्व शिकवतात, तुम्ही बीप खायचं आणि लोकांचे बळी घ्यायचे, देवेंद्र फडणवीस तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. तसेच इतका अकार्यक्षम गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही. तुम्ही अनिल देशमुख यांना अटक करायला निघाले होता. चार वर्षाच्यापूर्वी एका प्रकरणात. पण तुमच्या पक्षाच्या नेत्याच्या एका मुलाने अपघात केला, त्याला तुम्ही अभय देत आहात, कुठे फेडाल हे पाप," असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

Last Updated : Sep 11, 2024, 2:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.