ETV Bharat / state

वरळी हिट अँड रनमधील आरोपीच्या वडिलांचे दाऊदशी संबंध-संजय राऊत - worli hit and run case - WORLI HIT AND RUN CASE

हिट अँड रन प्रकरणावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. वरळी हिट अँड रनमधील आरोपीच्या वडिलांचे दाऊदशी संबंध असल्याचा खासदार राऊत यांनी आरोप केला.

Sanjay Raut allegation
Sanjay Raut allegation (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 11:38 AM IST

Updated : Jul 10, 2024, 12:11 PM IST

मुंबई- वरळीमधील हिट अँड रन प्रकरणावरून राज्यात वातावरण तापलं आहे. विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेना ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार राऊत म्हणाले, "सरकारकडून आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहेत. तुम्ही आरोपीच्या वडिलांचे गुन्हेगारीचे रेकॉर्ड तपासू शकता. आरोपीच्या वडिलांचे अंडरवर्ल्ड टोळीशी संबंध आहे. त्यांची मालमत्ता आणि आणि फॅन्सी गाड्या याबाबतचा खुलासाही व्हायला हवा. आरोपीनं ड्रग्ज घेतले होते. वैद्यकीय तपासणीच्या नोंदीत ते येऊ नये, म्हणून तीन दिवस त्याला लपविण्यात आले. वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपीला पहिल्या दिवसापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय येत आहे. पोलिसांना त्याचा हिशोब द्यावा लागेल. आरोपी सुटला तर त्याला रस्त्यावर जाब विचारावा. एका निष्पाप महिलेला वारंवार चिरडले."

गुन्हेगारांना पाठिशी घालणारे सरकार- पुढे खासदार राऊत म्हणाले, " नशेत निरपराध महिलेला चिरडले. हा खूप अमानुष प्रकार आहे. अशी व्यक्ती तुरुंगातून कधीच सुटू नये. आरोपीचे वडील खूप श्रीमंत आहे, एकनाथ शिंदे शिवसेनेचा नेता आहे. ते ठाण्यातील आहे, त्यावरून त्यांचे संबंध कोणाशीही आहे, हे समजू शकेल. हे राज्य सरकार मिंधे सरकार आहे. गुन्हेगारी स्वरुपातून हे सरकार बनले आहे. ते विधानसभेत आहेत. त्यांची गुन्हेगारी स्वरुपाची मानसिकता आहे. राज्यात गुन्हेगारांना पाठिशी घालणारे सरकार आहे." वरळीच्या घटनेत तेच दिसत आहे."

फाशीची शिक्षा दिली पाहिजे-खासदार राऊत यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. राऊत म्हणाले, " पैशाची मस्ती असलेल्या मुलानं निरपराध महिलेला चिरडलं. या मुलानं कोणती नशा केली होती? बापानं मुलाला पळून जाण्यास सांगितले. हा अपघात नाही, ही हत्या आहे. हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. संपूर्ण कुटुंब गुन्हेगार आहे. हा खुटला फास्ट ट्रॅक खटल्यात चालला पाहिजे. ती महिला अभिनेता जयवंत वाडकर यांची नातेवाईक होती. मराठी चित्रपटसृष्टीनं यावर बोलले पाहिजे. "

  1. पोलीस शोध घेताना आरोपी मिहीर टीव्हीवरून पाहायचा गुन्ह्याचा तपास, वरळी हिट अँड रनचा मुख्य आरोपी कसा पकडला? - Worli Hit and Run Case
  2. "आरोपी मिहीर शाहला फासावर लटकवा"; नाखवा कुटुंबाची मागणी - Worli Hit And Run Case
  3. "सत्ता आणि पैशाची गुर्मी"; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांना अश्रू अनावर - Worli Hit And Run

Last Updated : Jul 10, 2024, 12:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.