जालना Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली. नागपूरकडून मुबंईकडं जाणाऱ्या अर्टिगा कारला डिझेल भरुन रॉंग साईडनं येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारनं धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक समोर आलीय.
कसा घडला अपघात : समोर आलेल्या माहितीनुसार, रात्री अकराच्या सुमारास अपघातातील अर्टिगा कार क्रमांक एचएच 47, बीपी 5478 ही नागपूरवरुन मुंबईच्या दिशेनं जात होती. याचदरम्यान स्विफ्ट डिझायर क्रमांक एसएच12, एमएफ 1856 ही कार डिझेल भरुन राँग साईडनं येत असताना हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, स्विफ्ट कारनं धडक दिल्यामुळं अर्टिगा कार आणि स्विफ्ट कार महामार्गावरचे बॅरिकेड मोडून थेट खाली पडली. हा भीषण अपघात जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ झाला आहे. या अपघातात सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला, तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अद्याप पटली नाही मृतांची ओळख : घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साह्यानं दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इतर मदतकार्य घटनास्थळी पोहचायला उशीर झाला. त्यामुळं मृतांची संख्या वाढल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिलीय. रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्यानं मृतांची ओळख अजून पटली नसून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती जालना पोलिसांनी दिली.
हेही वाचा
- बहिणीला दिला ४ महिने त्रास, आता आणली लाडकी बहीण योजना : जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाना - Ladaki Bahin Yojana
- "चद्दर लगी फटने खैरात लगी बटने"; जयंत पाटीलांची अर्थसंकल्पावरुन मार्मिक टीका, पाहा व्हिडिओ - Jayant Patil on Budget
- तीन ड्रग्ज तस्करांना पुणे पोलिसांकडून अटक, एका नायजेरियन नागरिकासह पुण्यातील दोघांचा समावेश - Pune drug case
- पालखी सोहळ्यात सुनेत्रा पवारांनी खेळली फुगडी - Ashadhi Palkhi sohala