ETV Bharat / state

एक्स-रे काढण्यासाठी मुलीला काढायला लावले कपडे, घाटी रुग्णालयातील संतापजनक प्रकार; टेक्निशियनला अटक - Chhatrapati Sambhajinagar Crime - CHHATRAPATI SAMBHAJINAGAR CRIME

Sambhajinagar Crime News : एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या मुलीला कपडे काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये घडलाय. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर आता आरोपी टेक्निशियनला अटक करण्यात आली आहे.

Sambhajinagar Crime News technician arrested for ask girl to took off her clothes for x-ray in Ghati Hospital
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2024, 11:15 AM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Sambhajinagar Crime News : एक्स-रे काढण्यासाठी मुलीला कपडे काढायला लावण्याचा धक्कादायक प्रकार घाटी रूग्णालयात उघडकीस आला. चक्क कामावरून काढून टाकलेल्या टेक्निशियनने घाटी रुग्णालयाच्या एक्स-रे रूममध्ये अनधिकृत प्रवेश केला आणि तपासणीसाठी आलेल्या 26 वर्षीय तरुणीला चाचणीसाठी कपडे काढायला लावले. गुरुवारी (29 ऑगस्ट) या प्रकरणी राळ उठल्यानंतर आज (30 ऑगस्ट) टेक्निशियन शेख मोहम्मद फरहान शेख नदीमोद्दीन याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

नलिनी महाजन, विधानसभा संघटक, शिवसेना ठाकरे गट (ETV Bharat Reporter)
नेमकं काय घडलं? : बेगमपुऱ्यातील तरुणीला रविवारी छातीत वेदना होत होत्या. त्यामुळं ती आपल्या आईसोबत सायंकाळी 7:30 वाजता घाटी रुग्णालयात गेली. यावेळी डॉक्टरांनी तिला एक्स-रे काढण्यास सांगितले. 11/ड कक्षातील एक्स-रे रूममध्ये तेव्हा फरहान एकटाच हजर होता. टेक्निशियनच्या वेशभूषेत असल्यानं तरुणीलाही त्याच्यावर संशय आला नाही. त्यानं घाटीचा टेक्निशियन असल्याची बतावणी करून चाचणीसाठी पूर्ण कपडे काढावे लागतील, असं सांगितलं. हे ऐकून तरुणी काही काळ थांबली. मात्र, फरहाननं तांत्रिक कारण सांगून तिला टॉप काढायला लावत अश्लीलरित्या स्पर्श केला. या घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात पोहोचत संताप व्यक्त केला होता. मात्र, तक्रारदार मुलगी जबाब नोंदवण्यास आली नाही. त्यामुळं पुढील कारवाईस उशीर झाला.

महिला आघाडी आक्रमक झाल्यावर गुन्हा दाखल : लज्जास्पद कृत्य करणाऱ्या टेक्निशियन विरोधात शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीनं शासकीय रुग्णालय अधिष्ठाता यांना गुरुवारी जाब विचारला. सदरील आरोपी विरोधात तातडीनं कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात असा इशारा यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी दिला. रुग्णालयाबाहेरील या व्यक्तीला क्ष किरण यंत्र (एक्स-रे मशीन) वापरण्याची परवानगी कशी काय मिळते? विभागात प्रवेश करतांना विभागप्रमुख आणि सुरक्षारक्षकांनी आरोपीला प्रवेश का दिला? असे प्रश्न यावेळी अधिष्ठाता यांना विचारण्यात आले. रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळं एका युवतीला लज्जास्पद वागणुकीला सामोरं जावं लागलं. त्यामुळं या अन्याय झालेल्या मुलीला तातडीनं न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांनी दिली होती. या प्रकरणी घाटी रुग्णालय तर्फे बेगमपुरा पोलिसात तक्रार देण्यात आल्यानंतर कारवाई करत टेक्निशियन शेख मोहम्मद फरहान शेख नदीमोद्दीन याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. भाडेकरूला काढण्यासाठी वृद्ध दाम्पत्याचं मुन्नाभाई स्टाईल आंदोलन, पाहा काय आहे प्रकार? - Sambhajinagar Crime News
  2. चोरट्यांनी पैशांसाठी गॅस कटरनं फोडलं एटीएम, पण पैसेच जळून खाक; पाहा CCTV - Sambhajinagar Crime News
  3. गब्बर इज बॅक...; भ्रष्टाचारी नेते, पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्याकांडाची दिली धमकी - Sambhajinagar Crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.