ETV Bharat / state

छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मतदार संघात कार्यकर्त्यांमध्ये राडा, दिवसभरात झाले 68.89% टक्के मतदान

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाच्या दरम्यान काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेच्या दोन्ही गटात आणि एमअयएम तसंच भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष दिसून आला.

मतदानादिवशीचं छत्रपती संभाजीनगरमधील एक दृष्य
मतदानादिवशीचं छत्रपती संभाजीनगरमधील एक दृष्य (ईटीव्ही भारत बातमीदार)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मागील वर्षीच्या तुलनेने अधिक मतदान झाले (Assembly election 2024). 2019 विधानसभा निवडणुकीत जवळपास 66% टक्के मतदान झालं असताना यावर्षी 68.89% टक्के मतदान झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी काल दिलेली ही आकडेवारी आहे. अंतिमतः यात किरकोळ बदल होऊ शकतो. यामध्ये सिल्लोड मतदार संघात विक्रमी असे 80% टक्के मतदान झालं. तर सर्वात कमी 59.35% मतदान औरंगाबाद मध्य मतदार संघात झालं. दिवसभरात काही मतदार संघात राजकीय पक्षांमध्ये वादविवाद तर काही ठिकाणी मारामारी देखील झल्याच्या घटना घडल्या. तर वैजापूर मतदार संघात शिंदे गटाचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या वाहनावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली आहे.

संजय शिरसाट संतप्त - औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचा कार्यकर्ता यांच्यात वाद झाला. मतदान प्रक्रिया पार पडत असताना शिरसाट जात असताना ठाकरेंच्या कार्यकर्त्याने हातात ठाकरे पक्षाचा ध्वज घेत जोरदार घोषणबाजी केली. त्यावेळी शिरसाट यांनी आपला ताफा थांबवत त्या कार्यकर्त्याला धमकी देत दम भरला. त्यांनतर विरोधीपक्ष नेते अंबदास दानवे यांनी सदरील व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकून घटनेचा निषेध व्यक्त केला. यावर निवडणूक आयोगाचं लक्ष नाही का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिरसाट यांनी सदरील कार्यकर्ता करत असलेल्या कृतीने मतदारांना अडचण होत असल्यानं राग आला असं त्यांनी सांगितलं.

ठाकरेंच्या शिवसेनेचा ठिय्या - औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील वाळूज, बजाज नगर परिसरात पोलिसांनी मतदारांवर लाठी हल्ला केल्याचा आरोप ठाकरेंचे उमेदवार राजू शिंदे यांनी केला. त्यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासमोरच त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत रस्त्यावर ठिय्या आंदोलन मांडलं. त्यानंतर इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना विनंती करून आंदोलन मागे घेण्यास सांगितलं. मात्र, काही काळ वाळूज परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याचबरोबर वैजापूरचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रमेश बोरणारे यांच्या वाहनावर हल्ला झाला. यात बोरनारे यांच्या वाहनाचं नुकसान झालं.

एमआयएम-भाजपा आपापसात भिडले - औरंगाबाद पूर्व मतदारसघात मतदान केंद्रावर एम.आय.एम. कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली. एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील मतदान केंद्राची पाहणी करत असताना, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला. त्यादरम्यान भाजपाचे कार्यकर्ते आणि एमआयएमचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र, काही काळ पूर्ण मतदार संघात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

हेही वाचा...

  1. ईव्हीएम दुचाकीवरुन नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या गोंधळानंतर पोलीस संरक्षणात नेल्या मशीन
  2. विधानसभा निवडणूक 2024 : मुंबईत सर्वात कमी, तर नक्षलग्रस्त गडचिरोलीत विक्रमी मतदान, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील मतदान ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.