ETV Bharat / state

आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री: संभाजी भिडे यांचं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य - Bhide Controversial Statement

Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळं कायम चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. "आपल्याला दळभद्री स्वातंत्र्य मिळालंय. खरं स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्य आहे" असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sambhaji Bhide
संभाजी भिडे (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 10:23 PM IST

पुणे Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. पुण्यात पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी "आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हांडगं, दळभद्री स्वातंत्र्य आहे" असं वक्तव्य केलंय. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. संत तुकाराम महाराज तसंच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पुणे शहरात आगमन झालं. दरवर्षी या पालखी सोहळ्यात संभाजी भिडे असंख्य कार्यकर्त्यांसह सहभागी होतात. याच पार्श्वभूमीवर संभाजी भिडे पुण्यात आले. त्यानंतर संभाजी भिडे यांनी स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.

भिडेंना पुणे पोलिसांची नोटीस : जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज तसंच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या बरोबर धारकरी पालखीत सहभागी होतात. याआधी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. यावेळी शिवप्रतिष्ठाण अध्यक्ष संभाजी भिडे यांना आषाढी वारीत सहभागी होण्यावर निर्बंध नसले, तरी त्यांना पुणे पोलिसांनी वारीत सहभागी होण्यापूर्वी नोटीस दिली आहे. पालखी दर्शनावेळी कायदा-सुव्यवस्थेची काळजी घ्यावी, अशी सूचना भिडे यांना देण्यात आली.

हिंदवी स्वराज्याचं व्रत : यावेळी झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडे म्हणाले की,"वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आपल्याला रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचं आहे. गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या 7 मातांच्या संरक्षणासाठी वाटेल, ते करायला तयार असणं म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या व्रताची पथ्य आहेत. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, अशा 10-10 हजरांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत. तसंच प्रत्येक तालुक्यात आपल्याला 10 हजारांची तुकडी करायची आहे. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं आपल्याला तयार करायची आहेत".

हे वाचलंत का :

  1. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्याकडं प्रस्थान; राज्यभरातून हजारो वारकऱ्यांची उपस्थिती - Ashadhi Wari 2024
  2. शरद पवारांसारखे नास्तिक वारीत कसे चालणार? भाजपाची टीका - BJP criticizes Sharad Pawar
  3. उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या चित्रामुळेच... देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर - Sanjay Raut News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.