ETV Bharat / state

ईडीच्या भीतीनं पालकमंत्री पदासाठी हसन मुश्रीफ यांनी नात्यांचा सौदा केला: समरजीत घाटगेंचा हल्लाबोल - Samarjit Ghatge On Hasan Mushrif - SAMARJIT GHATGE ON HASAN MUSHRIF

Samarjit Ghatge On Hasan Mushrif : कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. सुप्रिया सुळे यांनी समरजित घाटगे यांच्या कार्यक्रमाला जायला नको होतं, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्याला आता समरजित घाटगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Samarjit Ghatge On Hasan Mushrif
समरजित घाटगे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 12:07 PM IST

Updated : Sep 26, 2024, 5:52 PM IST

कोल्हापूर Samarjit Ghatge On Hasan Mushrif : काही दिवसांपूर्वी काहींनी चुकीचे शब्द वापरले, मात्र ते शब्द का वापरले गेले याकडं जास्त लक्ष दिलं पाहिजे. शरद पवार कागलमध्ये पक्षप्रवेश आणि सभेला आले, जयंत पाटील आले. सुप्रिया सुळे पुण्याच्या मेळाव्यात आल्या. ज्यांनी चुकीचं वक्तव्य केलं त्यांचे एकेकाळी हे कुटुंब होतं, शरद पवार त्या व्यक्तीला आपल्या चिरंजीवांप्रमाणं वागवायचे. सुप्रिया सुळे थोरल्या भावाप्रमाणं राखी बांधायच्या. मात्र त्यांनी या नात्याचा ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी सौदा केला. या सौद्यामुळे त्यांना रात्री झोप येत नाही आणि त्यामुळे त्यांच्या तोंडून असे चुकीचे शब्द येत आहेत. मला त्यांची किव येते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत सिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

राजकीय विद्यापीठात मुश्रीफ विरुद्ध घाटगे सामना : राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात मुश्रीफ विरुद्ध घाटगे असा सामना पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी समरजितसिंह घाटगे यांनी पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये कागल विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. यानंतर समरजीत घाटगे यांचे विरोधक असलेले हसन मुश्रीफ यांनी बोलताना सुप्रिया सुळेंनी त्या हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जाण्याचं टाळायला हवं होतं. अशा शब्दांमध्ये समरजितसिंह घाटगे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

समरजीत घाटगे यांचं भाषण (ETV Bharat Reporter)

समरजित घाटगे यांचं सडेतोड उत्तर : मात्र या टीकेला आता समरजित घाटगे यांनी सडेतोड उत्तर दिले. "काही दिवसांपूर्वी काहींनी चुकीचे शब्द वापरले. मात्र जे शब्द वापरले गेले त्याच्यावर लक्ष देणं आवश्यक नाही. आता त्यांना उपरती सूचली आहे. आपण हे संबंध गमवून मोठी चूक केली आहे. मी माझ्या संबंधाचा सौदा केला, निष्ठेचा सौदा केला, मी माझ्या वडिलांच्या प्रेमाचा सौदा, केला बहिणीच्या विश्वासाचा सौदा केला आणि सौदा करुन त्यांनी पालकमंत्री पद मिळवलं. त्यासाठी आजपर्यंत त्यांना ज्यांनी जे काही दिलं त्यांचा विश्वास विकून त्यांनी त्यांच्या नेत्याची उतरत्या वयात साथ सोडली, याचा राग आहे. यामुळे त्यांना आयुष्यामध्ये झोप लागत नाही," असं प्रत्युत्तर समरजीत घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना दिलं आहे. पुढं बोलताना त्यांनी, "हसन मुश्रीफ यांची ही परिस्थिती पाहून मला त्यांची कीव येते. अशा व्यक्तीची अशी अवस्था होते, मात्र प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते, ती सीमा त्यांनी ओलांडली आहे. कागलची जनता ही सीमा ओलांडलेल्या लोकांना त्यांची जागा दाखवून देईल," असंही यावेळी घाटगे म्हणाले.

हेही वाचा :

  1. सुप्रिया सुळेंनी 'त्या' कार्यक्रमाला जायला नको होतं; मंत्री मुश्रीफांची समरजीत घाटगेंवर टीका - Hasan Mushrif
  2. "यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफांना शरद पवारांचा..."समरजीत घाटगे थेट बोलले! - Samarjit ghatage special interview
  3. Political Crisis : हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने समरजीतसिंह घाटगे नाराज; फडणवीसांची घेतली भेट

Last Updated : Sep 26, 2024, 5:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.