ETV Bharat / state

लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईला वॉन्टेड आरोपी म्हणून मुंबई पोलिसांनी केलं घोषित - Salman Khan House Firing - SALMAN KHAN HOUSE FIRING

Salman Khan House Firing : अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांना वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित केलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआरमध्ये आणखी तीन नवीन कलमांचा समावेश केला आहे.

Salman Khan House Firing
सलमान गोळीबार प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 9:31 PM IST

Updated : Apr 20, 2024, 10:20 PM IST

मुंबई Salman Khan House Firing : बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि भाऊ अनमोल बिश्नोई या दोघांना वॉन्टेड आरोपी घोषित करण्यात आलंय. तसंच सलमान खान गोळीबार प्रकरणात एफआयआरमध्ये ५०६ (२), ११५ आणि २०१ ही कलम वाढवण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.

तीन नवीन कलमांचा समावेश : अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआरमध्ये आणखी तीन नवीन कलमांचा समावेश केलाय. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, "मुंबई पोलिसांनी या एफआयआरमध्ये ५०६ (२), ११५ आणि २०१ ही कलमं जोडली आहेत." मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानं असंही सांगितलं की, "मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांना वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित केलंय." याआधी वांद्रे पोलीस यांनी भारतीय दंड संविधान कलम 307, 34, 120 ब आणि भारतीय हत्यार अधिनियम कलम 25 आणि 3 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आलाय.

सलमान खानच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची : हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट समोर गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात आणि देशातील चाहत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, मुंबई पोलिसांनी दमदार कामगिरी करत गोळीबार करणाऱ्यांना बेड्या ठोकल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अभिनेता सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. यावेळी अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा -

  1. Salman Khan : सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमधून लॉरेन्स बिश्नोईच्या नावे कॅब बुक करणाऱ्या तरुणाला अटक - Salman Khan
  2. लॉरेन्स बिश्नोईची कॅब पोहचली सलमानच्या घरी, कॅब चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात - Salman Khan Firing Case
  3. सलमान खान गोळीबार प्रकरण : वांद्रे पुलाखाली पिस्तूल पुरवणारी व्यक्ती पोलिसांच्या रडारवर - Salman Khan firing case

Last Updated : Apr 20, 2024, 10:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.