ETV Bharat / state

सलमान खान गोळीबार प्रकरण; तोपर्यंत अनुजचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, सीबीआय चौकशी करा: नातेवाईक आक्रमक - Salman Khan House Firing Case

Salman Khan House Firing Case : सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याची घटना मुंबईतील वांद्रे इथं घडली होती. याप्रकरणातील आरोपी अनुज थापन यानं पोलिसांच्या लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र अनुज थापनच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Salman Khan House Firing Case
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 11:55 AM IST

मुंबई Salman Khan House Firing Case : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आरोपी अनुज थापननं 1 मे रोजी मुंबई पोलिसांच्या लॉक अपमध्ये आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मुंबई पोलिसांनी 1 मे दुपारी 3 वाजता पंजाबला अनुजच्या घरच्यांना कळवली. मात्र, अनुजचा चुलत भाऊ विक्रम, आजोबा जसवंत सिंग, मामा कुलदीप बिश्नोई हे रात्री 1 वाजता विमानानं मुंबईत आले. त्यांनी जे जे रुग्णालयात अनुजचा मृतदेह पाहिल्यावर अनेक आरोप केले. त्यावेळी त्यांचे वकील परमहंस दीक्षित हे देखील जे जे रुग्णालयात उपस्थित होते. आरोपीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, असा पवित्रा अनुजच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

आरोपी अनुज थापनची आत्महत्या नव्हे तर खून : अनुजचा चुलत भाऊ विक्रम यानं सांगितलं की, "मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस गुरुवारी रात्रीपासून आमच्यावर दबाव आणत आहेत. मात्र जोपर्यंत याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही आणि एफआयआर नोंदवत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. पोलिसांनी आम्हाला अनुजला ओळखण्यासाठी नेलं होतं. मात्र त्यांनी आम्हाला फक्त अनुज थापनचा चेहरा दाखवला, संपूर्ण शरीर दाखवलं नाही. अनुज थापनच्या मानेवरील खुणा पाहता त्याचा खून झाल्याचं स्पष्ट होते, ही आत्महत्या नाही. त्याच्या मानेवर गोलाकार खुणा आहेत," असा आरोप अनुजच्या भावानं केला आहे.

अनुजच्या नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप : "23 एप्रिल रोजी पोलिसांनी अनुजला अटक केली. तेव्हा त्यांनी अनुजला अटक करून मुंबईला नेल्याचं त्यांनी कोणालाही सांगितलं नाही. दरम्यान गेल्या काही दिवसात कुटुंबीयांना कोणतीही माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली नाही. 1 मे रोजी दुपारी 3 वाजता मुंबई पोलिसांच्या लोकांनी फोन करुन आम्हाला सांगितलं की, अनुज थापननं आत्महत्या केली. तो सलमान खानच्या घरावर गोळीबाराच्या प्रकरणात अडकला आहे, हे आम्हाला 1 मे रोजी सांगण्यात आलं," असा गंभीर आरोप अनुजचा भाऊ विक्रम आणि आजोबा जसवंत यांनी केले आहेत.

अनुजच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी : "मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलीस सातत्यानं आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जोपर्यंत याप्रकरणी कारवाई होत नाही, तोपर्यंत सीबीआय तपास होत नाही, काहीही झालं तरी आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. तसेच अनुजच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी," अशी मागणी अनुजच्या नातेवाईकांनी केली. यावर मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, "आम्ही कोणताही दबाब आणला नसून सर्व प्रकरण आता स्टेट सीआयडीकडे आहे,"

हेही वाचा :

  1. खळबळजनक! सलमान खान गोळीबार प्रकरणातल्या आरोपीनं लॉकअपमध्ये केली आत्महत्या, सीआयडी करणार चौकशी - Salman Khan shooting case
  2. सलमान खान गोळीबार प्रकरण : अनमोल बिश्नोई विरोधात लूक ऑऊट नोटीस - Salman Khan Firing Case
  3. राखी सावंतनं सलमान खानसाठी पीएम मोदींकडे केलं आवाहन, सर्व वर्गातील सुरक्षाची केली मागणी - rakhi sawant

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.