ETV Bharat / state

आरोपी अनुज थापन आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळणार? उच्च न्यायालयानं आदेशात काय म्हटलं? जाणून घ्या - Salman Khan House Firing Case - SALMAN KHAN HOUSE FIRING CASE

Accused Anuj Thapan Death Case : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. आरोपी अनुज थापनच्या मृत्युप्रकरणी मुंबई पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत.

Salman Khan house firing case accused Anuj Thapan Death Case High court seeks Magisterial inquiry status report
सलमान खान गोळीबार प्रकरण (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 1:14 PM IST

वकिलांची प्रतिक्रिया (reporter)

मुंबई Accused Anuj Thapan Death Case : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या मृत्युप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दंडाधिकारी चौकशीची सद्यस्थिती काय?, याचा अहवाल 22 मे रोजी सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसंच, या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण आणि सीडीआर जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची बुधवारी (16 मे) सुनावणी झाली. अनुज थापनच्या आत्महत्येप्रकरणी त्याची आई रितादेवी यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय.

याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड अभिराज जैन, अ‍ॅड रजनी खत्री, अ‍ॅड राजवंत कौर यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घ्यावा. या संपूर्ण घटनेची केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी याचिकाकर्त्यांनी केली. तर, सरकारी वकिलांनी यावेळी स्पष्ट केलं की, या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीआयडीकडं सोपवण्यात आला. या प्रकरणाची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे.

संशयास्पद परिस्थितीत अनुजचा मृत्यू झाल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी आपण न्यायालयाकडं केल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दिली. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण जतन करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलं आहेत. या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईलचे सीडीआर जतन करुन ठेवण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. याप्रकरणी सुरू असलेल्या दंडाधिकारी चौकशीच्या सद्यस्थितीबाबत पुढील सुनावणीदरम्यान माहिती द्यावी, असे निर्देश न्यायालयानं सरकारी वकिलांना दिले. 22 मे रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण? : थापननं मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यावर थापनच्या कुटुंबियांनी त्याची आत्महत्या संशयास्पद असल्याची भूमिका घेतली. थापनच्या मृतदेहाचं जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचा मृतदेह पंजाबमधील त्याच्या मूळ गावी नेण्यात आला. मात्र, तिथं देखील त्याच्या कुटुंबियांनी पंजाब उच्च न्यायालयात याचिका करुन पुन्हा शवविच्छेदन करण्याची परवानगी घेतली.

हेही वाचा -

  1. सलमान खान गोळीबार प्रकरण; तोपर्यंत अनुजचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, सीबीआय चौकशी करा: नातेवाईक आक्रमक - Salman Khan House Firing Case
  2. सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी आरोपी रफिक चौधरीने आणखी दोन स्टारच्या घरांची केली होती पाहणी - Salman Khan house firing case
  3. सलमान खान गोळीबार प्रकरणात रोहित गोदाराला बनवले सहआरोपी - Salman Khan House Firing Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.