शिर्डी Sai Parikrama Ceremony : नर्मदा परिक्रमा, ब्रम्हगिरी परिक्रमा या धर्तीवर 'ग्रीन एन क्लीन फाउंडेशन', शिर्डी ग्रामस्थ, शिर्डी नगरपरिषद आणि सांईभक्तांकडून गेल्या पाच वर्षांपासून साई परिक्रमा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. नगरपरिषदेने या मार्गाची डागडुजी, स्वच्छता, लगतच्या वृक्षांची रंगरंगोटी केली आहे. परिक्रमेतून मिळणारी ऊर्जा आणि अनुभुतीमुळं दिवसेंदिवस परिक्रमेतील भाविकांचा सहभाग वाढत आहे.
अशी होणार परिक्रमेची सुरूवात : मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता खंडोबा मंदिरात महंत रामगिरीजी महाराज, महंत काशीकानंदजी महाराज, स्वामी परमानंद महाराज या मान्यवरांच्यासह इतरांच्या हस्ते साईप्रतिमेची पूजा करून परिक्रमेची सुरूवात होईल.
इतर शहरातील पालखीचा असणार सहभाग : यंदा परिक्रमेत रतलाम येथील पुजारी आणि झाकी, मध्यप्रदेश मधील फिरत्या वाहनांवर प्रात्यक्षिक करणारे पथक, वाराणशी येथील प्रसिद्ध डमरू, वस्त्र, वाद्य पथक, पुणे, नागपूर, बीड येथील साईरथ तसेच पालखीचा सहभाग असणार आहेत. शिर्डी परिसरातील सर्व शाळेच्या वतीनं श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि साईंच्या जीवन चरित्रावर चित्ररथ, लेझीम पथक, विद्यार्थ्यांचे पथनाट्य, विविध वाद्ये, टाळ मृदंग, भजनी मंडळ सहभागी होणार आहेत. चौदा किमीच्या परिक्रमा मार्गावर स्वच्छता, सडा, रांगोळ्या, स्वागत कमानी उभारण्यात येत आहेत.
शताब्दी मंडपात होणार परिक्रमेची सांगता : परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थ आणि भाविकांना चहा, अल्पोपहार, पाण्याची, स्वच्छतागृहे, प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था केली आहे. पोलिसांबरोबरच स्वयंसेवक म्हणून विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी सेवा देणार आहेत. शिडीर्तील अनेक हॉटेल मालकांनी भाविकांना सवलतीच्या दरात रूम उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मंगळवारी दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत साई मंदिरालगतच्या शताब्दी मंडपात परिक्रमेची सांगता होणार आहे.
हेही वाचा -