ETV Bharat / state

नोकरी न मिळल्यामुळे निराश न होता सागरने दिला आपल्या कलेला वाव - Sagar Somvanshi artist

Sagar Somvanshi artist देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. परंतु बेरोजगारीचं रडगाणं गाण्याऐवजी सागर सोमवंशी यांनी चित्रकलेत प्राविण्य प्राप्त करत यश संपदान केलं आणि अनेकांना रोजगार दिला. वाचा सविस्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 3:26 PM IST

Updated : Jun 24, 2024, 3:34 PM IST

Artwork by Sagar Somvanshi
सागर सोमवंशी यांची कलाकृती (ETV Bharat)

अहमदनगर Sagar Somvanshi Artist: संकटे आली की डगमगून जाणे हा मनुष्य स्वभाव! असचं संकट शहरातील सागर सोमवंशी यांच्या नशिबी आलं. परंतु बेरोजगारीचं रडगाणं गाण्या ऐवजी शहरातील सागर या शिक्षकानं अर्थात चित्रकारानं चित्रकलेचा उपासक बनून साधना सुरू ठेवली. आपल्या कुंचल्यातील रंगानं त्यांनी शहर आणि गावोगावच्या भिंतीना बोलक केलं. तसंच चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी अनेक रिकाम्या हातांना रोजगार दिला आहे.

सागर सोमवंशी यांची कलाकृती (ETV Bharat Reporter)

वडिलांच्या मार्गदर्शात सागर घडले : सागर सोमवंशी यांनी आर्ट टीचर डिप्लोमा आणि डिग्री केली आहे. कलाशिक्षक होण्याचं स्वप्न भंगलं नैराश्य सोबतीला आलं. मात्र, खचून न जाता कुटुंबातील सर्वांच्या पाठबळावर माझ्यातील चित्रकार जागा झाला. बेरोजगारीचं रडगाणं गाऊन पोट भरणार नाही. आयुष्य आणि भविष्य फुलवायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही म्हणून हाती घेतला ब्रश आणि रंगाचा कुंचला. वडील चित्रकार मोहन सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सागरनं व्यवसाय उभा केला.

दिले अनेक रिकाम्या हातांना रोजगार : त्यांनी मनाला सुन्न बनवणाऱ्या स्मशान भूमींचं रूप पालटलं. पर्यावरण, स्वच्छता, व्यसनमुक्ती, पाणी बचत, निसर्ग संवर्धन, आरोग्य, शिक्षण, मुलींच्या जन्माचं स्वागत अशा एक ना अनेक विषयांवर चित्रलेखन करत चित्रकला जिवंत ठेवली. चित्रकलेच्या माध्यमातून जागर करत, लोक शिक्षकाची प्रभावी भूमिका बजावून सागरनं चित्रकलेला आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे व्यावसायिक रूप दिलं आणि अनेक रिकाम्या हातांना रोजगार दिला आहे. नोकरीच्या मागे न लागता आपल्यातील कला कौशल्य यांना व्यावसायिक दृष्ट्या वापरून बेरोजगारीचं रडगाणं बंद करा हा संदेश सागर सोमवंशी या तरुणाने दिला आहे.

अनेक पुरस्कार : स्वच्छ भारत मिशनमध्ये राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय कीर्तीचं देवस्थान शिर्डी शहर तसंच महाराष्ट्र शासनाचा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त राहता तालुक्यातील आदर्श गाव खडकेवाके यासह जिल्ह्यात सागरच्या कलेनं भल्या भल्यांना भुरळ घातली आहे. हाताने रेखाटलेल्या चित्ररूपी संदेशानं भिंती माणसाशी संवाद साधू लागल्या. टाकावू वस्तू वेगवेगळे संदेश देताहेत. स्मशान भूमीचं रूप पालटलं. शहरे आणि गावाचं सौंदर्य बहरलं. घाणीचं साम्राज्य हटतय. स्वच्छतेचं महत्व वाढतंय. याला निमित्त ठरतंय हरहुन्नरी ध्येयवेडा चित्रकार अर्थात उच्चशिक्षित कला शिक्षक सागर सोमवंशी हे चित्रकला आणि हस्तकला याव्दारे शहरे आणि गावांचं सौंदर्य वाढवत आहेत.

जनजागृती संदेश : भिंतीवर महापुरुषांचे अनमोल विचार बोधवाक्य सुविचार जनजागृतीपर संदेश देऊन नागरिकांमध्ये आचार आणि विचारांचं तसंच संस्कार आणि संस्कृतीचे नवनवीन रंग सागर भरत आहेत. चित्रकलेच्या विविध कलाकृती साकारून नवनिर्मितीचा ध्यास घेणारे सागर, गाव खेड्यांचं रुपडं बदलवत आहेत. गावे तसंच शहरांना आदर्श आणि स्मार्ट ग्राम, माझी वसुंधरा अभियानात पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. यामध्ये सागर यांचासुद्धा खारीचा वाटा आहे हे टाळता येणार नाही. कलेचा साधक आणि उपासक होऊन ती कला कर्तव्यनिष्ठेने, प्रामाणिकपणे जोपासली तर स्वतः बरोबरच इतरांत तसंच गाव-शहरांमध्ये सकारात्मक बदल घडवता येतो हेच सागर यांनी आपल्या कला साधनेतून अधोरेखित केलं आहे.

हजारो चित्रकला शिक्षक बेरोजगार: आर्ट टीचर डिप्लोमा तसंच मास्टर ऑफ आर्ट, जी डी आर्ट अशा पदव्या घेऊन बाहेर पडलेले अनेक तरुण वर्षानुवर्षांपासून कला शिक्षक बनण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र बदलते युग माहिती आणि तंत्रज्ञान यामुळे कला शिक्षकांची भरती अनेक दिवसांपासून झाली नाही. परिणामी आता शिक्षक होण्याचं स्वप्न भंगलं आहे. त्यामुळे ज्याने स्वतःतील कौशल्य आणि कला जिवंत ठेवली असेल तो किमान कलाकार म्हणून का होईना आपले जीवन जगेल. मात्र त्याकरता स्वतःला बदलणे अत्यंत गरजेचे राहील. अन्यथा हे शिक्षण काहींसाठी निरुपयोगी ठरेल यात शंका नाही.

हेही वाचा

  1. कौतुकास्पद! भाजीपाला पिकवत पठ्ठ्यानं आधुनिक तंत्रज्ञान वापरत केली ऑर्किड फुलांची शेती - Orchid Farming
  2. मेळघाटात चक्क आंब्याचं गाव! आंब्यानं बहरला आमझरी परिसर, काय आहेत गावाची वैशिष्ट्ये - Mango Village

Last Updated : Jun 24, 2024, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.