ETV Bharat / state

"तुम्ही देव आहात की नाही हे स्वतः ठरवू नका, लोकांना ठरवू द्या", मोहन भागवत स्पष्टच बोलले... - Mohan Bhagwat - MOHAN BHAGWAT

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत काल पुणे दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी "क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखं कधी होऊ नये. चमकणं डोक्यात जातं. त्यामुळं वीज होऊन चमकण्यापेक्षा पणती होऊन तेवत राहावं,’ असा सल्ला दिला. स्वघोषित देवत्वाबद्दल भागवत यांनी मार्मिक मत व्यक्त केलं.

Mohan Bhagwat
मोहन भागवत (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2024, 2:08 PM IST

Updated : Sep 6, 2024, 3:00 PM IST

पुणे Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल पुण्यात शंकर दिनकर काणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी "मी देव झालो, असं स्वत: म्हणू नये तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या," असा खोचक टोला लगावला. त्यामुळं आता मोहन भागवत यांचा टोला नेमका कुणाला? असा सवाल विचारला जात आहे. शंकर दिनकर काणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे विधान केलं. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सचिव जयवंत कोंडविलकर, रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव यांच्यासह बांधकाम विकासक नितीन न्याती उपस्थित होते.

मोहन भागवत यांचा टोला (Source - ETV Bharat)

मोहन भागवत नेमकं काय म्हणाले : "प्रत्येकजण आपल्या कामातून आदरणीय व्यक्ती बनू शकते. पण आपण त्या पातळीवर पोहोचलो की नाही हे आपण स्वतः कधी ठरवू शकत नाही. ते इतरांनी ठरवावं लागतं. त्यामुळं मी देव झालो, असं स्वत: म्हणू नये. तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या. क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखं कधी होऊ नये. चमकणं डोक्यात जातं. वीज होऊन चमकण्यापेक्षा पणती होऊन तेवत राहावं," असं मोहन भागवत म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच एक वक्तव्य चर्चेत आलं होतं. त्या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर निशाणी साधला होता. आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी लगावलेला टोला मोदींसाठी तर नाही ना? अशी चर्चा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान "माझा जन्म जैविक प्रक्रियेतून झाला नसल्याचं विधान केलं. माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. मला ईश्वरानं आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी पाठवलं", असं मोदी म्हणाले होते.

द्वेषाची आग शांत करता आली पाहिजे : मोहन भागवत यांनी यावेळी जातीय हिंसाचाराच्या आगीत होरपळणाऱ्या मणिपूरच्या स्थितीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, "मणिपूरमधील कठीण परिस्थितीतही आपण कणखरपणे उभे आहोत. संताप, क्रोध, द्वेष विसरून नागरिकांमधील संघर्ष थांबावा म्हणून सर्व घटकांशी संवाद साधत आहेत. मणिपूरमधील द्वेषाची आग भडकू न देता शांत करता आली पाहिजे. ही परिस्थिती कशी बदलवता येईल, याचा कृतीशील विचार आवश्यक आहे."

हेही वाचा

  1. "पळून पळून कुठं जाणार होता?", जयदीप आपटेच्या अटकेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - Eknath Shinde
  2. "माफी तोच मागतो, जो चुकीचं काम करतो", राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र - Shivaji Maharaj Statue Collapse
  3. जयदीप आपटेला बेकायदेशीर काम देणारे सूत्रधार आजही सरकारमध्ये-संजय राऊत - Sanjay Raut News

Last Updated : Sep 6, 2024, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.