ETV Bharat / state

शिंदे-फडणवीस-पवारांनी पाहणी दौऱ्यात वापरलेल्या रॉल्स रॉईसवर होता चक्क ट्रकचा नंबर, वाचा काय आहे ही भानगड - Rolls Royce number - ROLLS ROYCE NUMBER

CM Eknath Shinde : मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिंटेज कारमधून दौरा केला. मात्र या रोल्सरॉईस गाडीला चक्क ट्रकची नंबरप्लेट लावलेल्याचं आता स्पष्ट झालं आहे. या गाडीवरील वाहन नोंदणी क्रमांक ट्रकचा नोंदवला असल्याचं निदर्शनास आलं आहे.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 7:40 PM IST

मुंबई CM Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क चुकीचा वाहन नोंदणी क्रमांक असलेल्या गाडीतून दिमाखात प्रवास केला. मुंबई कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी ज्या व्हिंटेज रोल्स रॉईस कारमधून प्रवास केला त्या कारवर ट्रकचा नोंदणी क्रमांक होता हे आता अधिकृत नोंदीवरून स्पष्ट झालं आहे. यामुळे आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

त्या कारचा क्रमांक ट्रकचा : रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी 1930 सालची ही रोल्स रॉइस या प्रसंगी दिली होती. सोमवारी उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते. या कारवर नोंदणी क्रमांक MHO4 JU4733 लिहिलेला होता, जो एका ट्रकचा नोंदणी क्रमांक आहे. विशेष म्हणजे परिवहन विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत आहे.

पेंटरने बदलला गाडीचा क्रमांक : दरम्यान, गाडीचा क्रमाक रंगवणाऱ्या व्यक्तीकडून चुकीने हा क्रमांक बदलला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या ऑनलाइन 'वाहन' डेटाबेसनुसार, MHO4 JU4733 हा आयशर ट्रकचा क्रमांक आहे. जो ठाण्यात राहणाऱ्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत आहे. तर रोल्स रॉयसचा वास्तविक नोंदणी क्रमांक MHO4 JV4733 आहे. पेंटरने त्या गाडीवर चुकून 'V' ऐवजी 'U' लिहिलं होतं.

चुकीचा नोंदणी क्रमांक हा गुन्हा : वास्तविक आरटीओ नियमानुसार कोणत्याही वाहनावर चुकीचा नोंदणी क्रमांक टाकणे हा तांत्रिकदृष्ट्या गुन्हा आहे. मात्र, आता स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या गाडीमधून प्रवास करत होते, त्याच गाडीवर चुकीचा क्रमांक टाकण्यात आलेला होता. त्यामुळे या प्रकरणावरून वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा:

  1. ठरलं! विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार; बंडखोरांबाबत घेतला मोठा निर्णय - Mahavikas Aghadi PC
  2. मुंबईतील तब्बल 1253 एकर मोक्याची जागा अदानी समूहाला; राजकारण तापलं - Mumbai Land To Adani Group
  3. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची तत्काळ मुक्तता करावी; मुंबई उच्च न्यायालयात याचिका - Porsche Car Accident Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.