ETV Bharat / state

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला खास सत्कार - felicitated by Chief Minister - FELICITATED BY CHIEF MINISTER

Felicitated by Chief Minister भारतीय क्रिकेट संघ विश्वविजयी होऊन मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या सत्काराचा सपाटा सुरू आहे. आज रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रिकेटपटूंचा सत्कार
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रिकेटपटूंचा सत्कार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 5:27 PM IST

Updated : Jul 5, 2024, 5:32 PM IST

मुंबई Felicitated by Chief Minister - अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळाल्यानंतर सर्व देशवासीयांनी भारतीय संघाचं तोंड भरून कौतुक करत जल्लोष साजरा केला होता. मायदेशी परतल्यानंतर भारतीय संघानं शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्कार स्वीकारून मुंबईत भारतीय संघाचा विश्वचषकासह रोड शो पार पडला. त्यानंतर वानखेडे मैदानावर भव्य कार्यक्रम झाला. संघाला सव्वाश कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. तर आज विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील मुंबईतील चार खेळाडूंचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी सत्कार केला.

तब्बल 13 वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात भारताने जोरदार कामगिरी करत विश्वचषकावर आपलं नाव कोरल. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. बीसीसीच्या वतीने देशभरातून भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांकडून भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करून ठिकठिकाणी जल्लोष देखील साजरा करण्यात आला होता. टी ट्वेंटी विश्वचषकासह भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला, त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही सत्कार स्वीकारला. तर संध्यकाळी बीसीसीआयच्या वतीने भव्य दिव्य कार्यक्रम मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला.

शुक्रवारी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या वतीने t20 विजेत्या भारतीय संघातील मुंबईतील चार खेळाडूंचा सत्काराचा सोहळा विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये होत आहे. त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी, भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव , शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चौघा खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसंच कप्तान रोहित शर्मा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सामन्यातील रोमहर्षक क्षणांसंदर्भात तसंच विजयाबाबत चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांकडून सत्कार स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव , शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभावनाकडे रवाना झाले.

हेही वाचा..

  1. टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीवरुन सत्ताधारी- विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, कशावरून नेमका आहे वाद? - Team India Mumbai Victory Parade
  2. टी २० विश्वविजेता टीम इंडियाचा मुंबईत विजयोत्सव, लाखो क्रिकेटप्रेमी उतरले रस्त्यावर - Team India Mumbai Victory Parade
  3. टीम इंडियानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, रोहित आणि द्रविडनं दिली ट्रॉफी - indian Cricket team welcome

Last Updated : Jul 5, 2024, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.