ETV Bharat / state

Yugendra Pawar : पवार कुटुंबीयांबद्दल आदर आणि प्रेम; पण 'तसल्या' कार्यकर्त्यांना आवरा, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी - Lok Sabha Elections

Yugendra Pawar : युगेंद्र पवार हे सध्या बारामती तालुक्यात गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर भागात प्रचार करताना युगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्याबद्दल जाब विचारला.

Pawar Family
पवार कुटुंबीयांबद्दल आदर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 11:03 PM IST

बारामती (पुणे) Yugendra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्याचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत यावेळी पाहायला मिळणार आहे. लढतीत दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबीय बाहेर पडले आहे. गाव, वाड्या-वस्त्यावर घोंगडी बैठका, भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

'त्या' कार्यकर्त्यांना आवर घाला : बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर भागात प्रचार करताना युगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्याबद्दल जाब विचारला. शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. पवार कुटुंबीयांबद्दल आदर आणि प्रेम असून सोशल मीडियावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी मागणी यावेळी युगेंद्र पवार यांच्याकडे करण्यात आली.

त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आणि प्रेम : युगेंद्र पवार हे सध्या बारामती तालुक्यात गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंबंधी श्रीनिवास पवार यांनी नुकतीच काही मते व्यक्त केली होती. त्या व्हिडिओचा आधार घेत तो सोशल मीडियावर फिरवला जात आहे. त्यात काही ठराविक वाक्यांची रिल्स बनवून तीच वारंवार समाज माध्यमांवर टाकली जात आहे. पवार कुटुंबातील कोणतीही व्यक्ती असू द्या, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आणि प्रेम आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी मागणी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांच्याकडे केली.

त्यामध्ये सुधारणा करू : आम्ही पवार कुटुंबावर कायम प्रेम करत आलो आहोत; परंतु अजित पवार यांच्याबद्दल श्रीनिवास पवार बोलले तो व्हिडीओ एडीट करून तो जाणूनबुजून व्हायरल केला जात असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. युगेंद्र यांनी ते ऐकून घेत सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले आहे.

हेही वाचा :

  1. Lok Sabha Elections : अजित पवारांनी केलं दोन पिढ्यांचं नुकसान; 'मी बारामतीतूनच लढणार', शिवतारेंच्या भूमिकेमुळं महायुतीत संघर्ष
  2. MP Vinayak Raut : दोन दिवसांत महाविकास आघाडीच्या सर्वच जागा जाहीर होतील - खासदार विनायक राऊत
  3. Babasaheb Shinde : आमदार खासदार होण्यासाठी पठ्ठ्याने विकली तब्बल पन्नास एकर जमीन; २३ निवडणुका हरला, पुन्हा लोकसभा लढणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.