ETV Bharat / state

राठोड, सत्तार नापास; मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची भीती, कुणाकुणाला लॉटरी लागणार? - SHIVSENA REPORT CARD

राज्यातील नवीन सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांचं आणि माजी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आलं आहे.

SHIVSENA REPORT CARD
एकनाथ शिंदे (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2024, 9:18 PM IST

Updated : Dec 8, 2024, 9:30 PM IST

मुंबई : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन होऊन सदस्यांनी आमदारकीची शपथही घेतली. या पुढील टप्पा हा मंत्रिमंडळ विस्ताराचा असून, मंत्रिपदासाठी अनेकांनी जोरदार लॉबिंग सुरू केलं आहे. शिवसेनेच्या आमदार आणि माजी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आलं असून, त्यात 6 माजी मंत्री पास तर 2 माजी मंत्री नापास झाल्याची माहिती समोर आली. नापास मंत्र्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नसल्यानं त्यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा सुरू आहे.

महायुतीला प्रचंड बहुमत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात नवं सरकार स्थापन झालं असून, आतापर्यंत फडणवीस यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूरात सुरू होत आहे. त्यापूर्वी 12 डिसेंबरपर्यंत इतर मंत्र्यांचा शपथविधी केला जाणार आहे. यंदा महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असून, आमदारांची संख्याही वाढली आहे. त्यात अनुभवी आमदारांसोबत नवीन आमदार सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळाच्या यादीत नावं येण्यासाठी अनेक नेत्यांनी लॉबिंग सुरू केली आहे.

दोन मंत्री नापास ठरले? : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांचं आणि माजी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी एका एजन्सीमार्फत आमदारांचं आणि माजी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार केलं असून, त्यात दोन माजी मंत्री नापास ठरले असल्यानं मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कार्डमध्ये मराठवाड्यातील माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि विदर्भातील माजी मंत्री संजय राठोड यांना नापास केलं गेल्याची चर्चा आहे. यावर अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. तसंच अनेक आमदार आणि माजी मंत्र्यांनी आपला नंबर लागावा यासाठी मोठी लॉबिंग सुरू केली आहे.

एकनाथ शिंदेंना करावी लागणार तारेवरची कसरत : महायुतीमध्ये शिवसेनेला 10 ते 12 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं कुठल्या आमदारांची वर्णी लावावी ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 57 अधिक 3 असं 60 आमदारांचं बळ आहे. त्यापैकी फक्त 10 ते 12 आमदारांनाच मंत्रिपद मिळणार असल्यानं आमदार निवडताना एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

शिवसेनेच्या रिपोर्ट कार्डनुसार पास झालेले संभाव्य मंत्री

  • उदय सामंत
  • दादा भुसे
  • गुलाबराव पाटील
  • शंभूराजे देसाई
  • तानाजी सावंत
  • दीपक केसरकर
  • भरतशेठ गोगावले
  • संजय शिरसाट
  • प्रताप सरनाईक
  • अर्जुन खोतकर
  • विजय शिवतारे

हेही वाचा

  1. "विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय..."; राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
  2. थोर महापुरूष, देव- देवता, संत-महंतांचं स्मरण करत १०६ सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ
  3. "तुम्हाला जी मतं मिळाली ती...", आदित्य ठाकरेंच्या आरोपावर रईस शेख यांचं प्रत्युत्तर

Last Updated : Dec 8, 2024, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.