ETV Bharat / state

36 जणांना फाशीवर लटकवणारे राजकारणात होणार का 'उज्ज्वल'; जाणून घ्या प्रवास - Ujjwal Nikam - UJJWAL NIKAM

Ujjwal Nikam : प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून भाजपानं लोकसभेची उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळं उज्जवल निकम आता लोकसभेची निवडणूक जिंकून संसदेत युक्तीवाद करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांना काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचं तगडं आव्हान असणार आहे.

Ujjwal Nikam
Ujjwal Nikam
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 8:13 PM IST

मुंबई Ujjwal Nikam : भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक यादी जाहीर केली आहे. यात भाजपानं देशातील प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून तिकीट दिलं आहे. या जागेवर पूनम महाजन विद्यमान खासदार असून भाजपानं त्यांचा पत्ता कट केलाय. त्यांच्या जागी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर मोठी खेळी केलीय.

37 जणांना फाशी : देशातील प्रसिद्ध वकिलांमध्ये उज्ज्वल निकम यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत विविध खटल्यात 37 जणांना फाशिच्या फंद्यापर्यंत पोहचवलंय. तसंच उज्वल निकम यांच्या युक्तीवादामुळं 628 जणांना जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागतेय. उज्ज्वल निकम यांचा जन्म उत्तर महाराष्ट्रत जळगाव जिल्ह्यात एका एका मराठी कुटुंबात झालाय. त्यांचं वडील न्यायाधीशासह बॅरिस्टर होते. त्यांनी जळगावच्या एसएस मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतलीय. निकम यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक मोठे खटलेही लढवले आहेत.

निकम यांनी लढवले मोठे खटले : उज्ज्वल निकम यांनी 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, मरीन ड्राईव्ह बलात्कार प्रकरण, 26/11 हल्ला प्रकरण, कोपर्डी बलात्कार प्रकरण अशा अनेक हायप्रोफाईल केसेसमध्ये सरकारी वकील म्हणून भूमीका बजावलीय. तसंच, उज्ज्वल निकम यांनी 2010 मध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रात आयोजित केलेल्या दहशतवादावरील जागतिक परिषदेत भारत सरकारचं प्रतिनिधित्व केलंय.

निकम यांनी लढवलेले महत्वाचे खटले :

  • 1991 - कल्याण रेल्वे स्फोट
  • 1993 - मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण
  • 1994 - पुणे राठी हत्याकांड
  • 2003- गेटवे ऑफ इंडिया तसचं जवेरी बॉम्बस्फोट प्रकरण
  • 2003 - गुलशन कुमार हत्या प्रकरण
  • 2004 - नदीमचं लंडनमधून प्रत्यार्पण प्रकरण
  • 2006 - गँगस्टर अबू सालेम प्रकरण
  • 2006 - प्रमोद महाजन हत्या प्रकरण
  • 2008- 26/11- मुंबई दहशतवादी हल्ला
  • 2010 - शक्ती मिल गँगरेप प्रकरण
  • 2016 - डेव्हिड हेडली प्रकरण
  • 2016 - कोपर्डी बलात्कार प्रकरण

पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित : वास्तविक, उज्ज्वल निकम भारतीय विशेष सरकारी वकील आहेत. ज्यांनी खून, दहशतवादाच्या खटल्यांवर मोठं काम केलं आहे. उज्ज्वल निकम यांनी 26/11१ च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्यादरम्यान दहशतवादी अजमल कसाबला फाशीप्रर्यंत पोहचवण्यासाठी महत्वाची भूमीका बजावलीय. एका रिपोर्ट्सनुसार, उज्वल निकम यांनी 628 दोषींना जन्मठेप तसंच 37 जणांना फाशीच्या शिक्षापर्यंत पोहचलंय. 2016 मध्ये, उज्ज्वल निकम यांना भारत सरकारनं पद्मश्री देऊन सन्मानित केलंय.

कोणाच्या विरोधात निवडणूक लढवणार? : उज्ज्वल निकम आता उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवणार आहेत. या जागेवरून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलीय. भाजपाच्या पूनम महाजन या या जागेवरून विद्यमान खासदार आहेत. पूनम महाजन यांनी 2014 तसंच 2019 मध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा पराभव करत विजय मिळवला होता. मात्र, यावेळ भाजपानं त्यांचा पत्त कट करत उज्वल निकम यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकलीय.

हे वचालंत का :

  1. भाजपाकडून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी; विद्यमान खासदाराचा पत्ता कट - Ujjwal Nikam Lok Sabha Candidate
  2. पंकजा मुंडेंनी मारली पलटी! म्हणाल्या, "प्रीतम मुंडेंविषयीचं वक्तव्य..." - Pankaja Munde
  3. नावारूपाला येणाऱ्या नेत्यांना गायब करणं ही काँग्रेसची परंपरा, खासदार उदयनराजेंचा खळबळजनक आरोप - MP Udayanraje Bhosale

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.