ETV Bharat / state

रील करताना 300 फूट दरीत कोसळली, मुंबईतील रील स्टारचा रायगडच्या दरीत पडून मृत्यू - Reel Star Aanvi Kamdar

Aanvi Kamdar Dies : व्यवसायानं चार्टर्ड अकाऊंटंट आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर असलेल्या तरुणीचा रिल बनवण्याच्या नादात जीव गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (17 जुलै) घडली. माणगावच्या कुंभे धबधबा येथे ही दुर्घटना घडली.

Reel Star Aanvi Kamdar dies after falling into ravine while filming instagram reel in Raigad
अन्वी कामदार मृत्यू (Social Media)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 9:11 AM IST

Updated : Jul 18, 2024, 12:10 PM IST

मुंबई Aanvi Kamdar Dies : रिल्ससाठी लोक काहीही करायला तयार असतात. मात्र, अनेकदा हे व्हिडिओ बनवणं आणि फोटो काढणं धोकादायकही ठरतं. इतकंच नाही तर यामुळं काहींना आपला जीवही गमवावा लागतो. मागील महिन्याभरात घडलेल्या दोन घटनेनंतर आता अशीच आणखी एक घटना माणगावमध्ये घडलीय. माणगाव तालुक्यातील कुंभे येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा इन्स्टाग्रामसाठी रिल करताना दरीत पडून मृत्यू झाला. अन्वी कामदार असं या तरुणीचं नाव असून ती व्यवसायानं चार्टर्ड अकाऊंटंट होती. तर सोशल मीडियावर इन्फ्ल्यूएन्सर म्हणून ती नावारूपास आली होती.

नेमकं काय घडलं? : मिळालेल्या माहितीनुसार, अन्वी कामदार आपल्या सात सहकाऱ्यांसह वर्षासहलीसाठी माणगावमधील कुंभे इथं आली होती. एका कड्यावर इन्स्टाग्रामसाठी रील बनवत असताना तोल जाऊन ती 300 फूट दरीत कोसळली. तिच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती माणगाव पोलीस ठाण्यात कळवली. माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक बचाव पथकांना पाचारण केलं. दोरीच्या साहाय्यानं बचाव पथकं दरीत उतरली. यावेळी अन्वी गंभीर जखमी अवस्थेत असल्याचं आढळलं. तिला तात्काळ स्ट्रेचरच्या साहाय्यानं दोरीनं ओढून वर काढण्यात आलं. मात्र, माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता.

तिसरा बळी : 17 जून रोजी अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ घडली होती. या घटनेत रिल्स बनवण्याच्या नादात एका 23 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. तरुणीला कार चालवताना रिल शूट करायची होती. मात्र, कार चालवायला ती नवीन असल्यानं तिनं कार पुढं नेण्याऐवजी रिव्हर्स गिअर टाकला. त्यानंतर कार पाठीमागं असलेल्या दरीत कोसळली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बीडमध्येदेखील अशाच प्रकारची घटना घडली. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवताना अपघात होवून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना ही धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली.

हेही वाचा -

  1. धावत्या दुचाकीवर रिल काढणं पडलं महागात; एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी - Beed Accident
  2. मित्र रिल्ससाठी शूट करताना तरुणीनं चुकून टाकला रिव्हर्स गिअर, दरीत कार कोसळल्यानंतर गमाविलं आयुष्य - Chhatrapati Sambhajinagar Accident
  3. हिट अँड रनमध्ये पती-पत्नीचा मृत्यू; अपघातापूर्वीची 'सोन्याचा संसार' इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल - Chhatrapati Sambhajinagar Accident

Last Updated : Jul 18, 2024, 12:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.