मुंबई : Ayushman Bharat Yojana : आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनवण्यासाठी आधार केंद्र किंवा अन्य आयुष्यमान भारत योजना केंद्र येथे जाऊन नोंदणी करावी लागते. यावेळी नोंदणीसाठी वैयक्तिक विविध कागदपत्राद्वारे केवायसी केली जाते. केवायसी दरम्यान नागरिकांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न, कुटुंबातील सदस्य तसंच अन्य बाबींची माहिती घेतली जाते. मात्र, ही नोंदणी करतेवेळी जर तुमच्याकडे पिवळे, केसरी किंवा पांढरे यापैखी कोणतंही रेशन कार्ड नसेल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे. मुंबई किंवा उपनगरात अनेक लोकं भाड्याने राहतात. ज्यांचं स्वतःचं घर नाहीय ती लोकं भाड्याने राहतात आणि जे लोकं भाड्याने राहतात त्यांच्याकडे स्वाभाविकपणे रेशन कार्ड नसतंच. (Ayushman Bharat Yojana conditions) मग कित्येक भाडेकरू आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीय अशी लोकं या योजनेपासून वंचितच आहेत. त्या लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा कधीच मिळणार नाही.
मग योजना काय कामाची? : जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही त्याचा नियमित वापर करीत नसाल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. पिवळे, केशरी आणि पांढरे रेशन कार्ड असेल आणि त्या कार्डवरून जर तुम्ही रेशन दुकानावरून धान्य येत नसाल आणि तुमचे कार्ड ऍक्टिव्ह नसेल तरीसुद्धा तुम्ही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. कारण कार्ड ऍक्टिव्ह नसल्यामुळे तुमची संपूर्ण माहिती दिसत नाही. परिणामी केवायसी होत नाही. तुमची नोंदणी यशस्वी न झाल्यामुळे आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला मिळवता येत नाही. "आम्ही ठाण्यावरून आलेलो आहोत. पण आमच्याकडे रेशन कार्ड नसल्यामुळे आयुष्यमान भारत योजनेच्या निकषात आम्ही बसू शकत नाही. त्यामुळं या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. असं ठाण्यावरून नरिमन पॉईंट येथे नोंदणीसाठी आलेले रमेश जाधव यांनी सांगितलं आहे" तर, आम्ही कित्येक वर्ष मुंबईत भाड्याने राहतोय आमच्याकडे स्वतःचे घर नाहीये. (Ayushman Bharat Yojana Terms) त्यामुळे रेशन कार्ड नसल्यामुळे या योजनेमध्ये आम्ही बसत नाही. याचा फायदा घेऊ शकत नाही. केंद्र सरकारने 5 लाखाची आयुष्यमान भारत योजना आणली आहे, त्याचा फायदा सामान्य लोकांसाठी होत नसेल तर ती योजना काय कामाची? असा संतप्त सवाल कुर्ला येथे राहणारे दीपक कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकाकडून नाराजी : आयुष्मान भारत योजना 2019 पासून देशभरात सुरू आहे. पाच लाख विमा संरक्षण यात देण्यात आले आहे. यामध्ये 1200 च्यावर विविध आजारावर यातून उपचार मिळू शकतात. "दररोज अनेक नागरिक, शेतकरी, नोकरदारवर्ग आमच्या केंद्रावर आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी येतात. परंतु, अनेक नागरिकांचे रेशन कार्ड ऍक्टिव्ह नसतं किंवा ते रेशन कार्डवरून धान्य घेत नाहीत. किंवा ज्यांची पाच एकरपेक्षा अधिक शेती आहे ते देखील या निकषात बसत नाहीत. हे अनेक नागरिकांना माहित नसल्यामुळे आमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी येणारे अनेक नागरिक नाराज होऊन परत जात आहेत. असं आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करणारे बाळू कलागते यांनी सांगितलं आहे.
आगामी काळात दुरुस्ती दिसेल : दुसरीकडं आयुष्यमान भारत योजनेतील अनेक अटी आणि निकषामुळे या लाभापासून अनेक लोकांना वंचित राहावं लागतात आहे. परंतु, यामध्ये भविष्यकाळात काही दुरुस्ती किंवा सुधारणा दिसून येईल. असं 'आयुष्यमान भारत योजना' मुंबई जिल्हा केंद्राचे मॅनेजर मनवेल वळवी यांनी सांगितलं आहे. सध्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये जे काही निकष आणि अटी आहेत. त्याच्यावर काम सुरू आहे. ज्या काही जाचक अटी असतील ज्यामुळं नागरिकांना लाभ घेता येत नाही. त्यामध्ये अपग्रेड होत आहे. दुरुस्ती होत असून, भविष्यात सुधारणा होईल. जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल, असंही आयुष्यमान भारत योजना मुंबई जिल्हा केंद्राचे मॅनेजर मनवेल वळवी यांनी म्हटलं आहे.
अटी आणि निकष
- जर तुमच्याकडे केसरी, पिवळे किंवा पांढरे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही या योजनेत बसू शकत नाहीत.
- ज्यांच्याकडे दुचाकी, किंवा कारसारखे वाहन आहेत, ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
- शासकीय कर्मचारी ज्यांच्याकडे शेतीची यंत्रे आणि उपकरणे आहेत, ते याचा फायदा घेऊ शकत नाहीत.
- ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, ते योजनेसाठा पात्र ठरु शकत नाहीत.
- निम्म शासकीय बिगर कृषी उद्योगांमध्ये काम करणारे लोकं देखील पात्र ठरु शकत नाहीत.
हेही वाचा :
1 खिचडी घोटाळ्यात संजय राऊत हे मुख्य सूत्रधार, ईडीनं त्यांना अटक करावी-संजय निरुपम - Khichdi scam