ETV Bharat / state

Mahayuti Seat Allocation : 'मनसे'बरोबर युती? फडणवीस आणि बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं...

Mahayuti Seat Allocation : भाजपाची तिसरी यादी लवकरच येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तीन पक्षांची चर्चा सुरू आहे. ती चर्चा लवकरच पूर्ण होईल, असं मला वाटतंय, असंही फडणवीस म्हणाले. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तिसरी यादी लवकरच जाहीर होणार असल्याचं सांगितलं.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 9:15 PM IST

Updated : Mar 14, 2024, 9:26 PM IST

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष

नागपूर Mahayuti Seat Allocation : लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा सध्या महायुतीमध्ये सुरू आहे. यावर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलंय. "भाजपानं जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची घोषणा केलीय. उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील येत्या काळाला होईल. गेल्यावेळी भाजपाकडून २५ जागा लढवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आधी २५ उमेदवार जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यानंतर नव्यानं भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघात उमेदवार जाहीर होईल," अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. फडणवीस आणि बावनकुळे हे दोघेही नागपुरात बोलत होते.

केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार : "कुणाला कुठून उमेदवारी द्यायची आहे याबाबत केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. गेल्यावेळी आम्ही २५ जागा लढवल्या होत्या. केंद्रीय नेतृत्व त्यासंदर्भात चर्चा करून अंतिम यादी जाहीर करेल. सर्व घटकांना सन्मानजनक जागा मिळतील आणि आम्ही ४५ जागा जिंकु हा आमचा अहंकार नाही तर विश्वास आहे," असं बावनकुळे म्हणाले.

मनसेबरोबर युती? : "विकसित भारत संकल्पना साधण्यासाठी इतर घटक पक्ष सामील होणार असेल तर हरकत नाही. राज ठाकरे आणि भाजपाचे विचार सारखे आहेत," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तर "मनसे संदर्भात आज मी अधिकारीक स्वरूपात काहीही बोलू शकत नाही. मला वाटतं की चर्चा खूप होत आहेत. या संदर्भात निर्णय झाला तर आम्ही तुम्हाला सांगू," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळणार : "महायुतीमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं स्थान महत्त्वाचं आहे. जागावाटपाच्या संदर्भात कुणावर अन्याय होणार नाही. आमच्या मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळणार आहेत. मोदी गॅरेंटीवर निवडणूक लढवली जाईल आणि ४५ जागा आमच्या जिंकून येतील," असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. "महायुतीमध्ये जागावाटप संदर्भात कुठलाही उशीर झालेला नाही. 80 टक्के काम आम्ही पूर्ण केलंय. 20 टक्के काम अजून बाकी आहे. महायुतीचे सर्व उमेदवार लवकरच जाहीर केले जातील," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नितीन गडकरींचं कौतुक : "नितीन गडकरी यांनी नागपूर शहराला जगातील सर्वोत्तम शहर करण्यासाठी प्रयत्न केले हे उल्लेखनीय आहे. क्रीडा, साहित्य, शिक्षणासह सर्वच क्षेत्रात त्यांनी भरीव कामं केली आहेत. त्यामुळं यावेळची निवडणूक नितीन गडकरी हे ऐतिहासिक मतांनी जिंकतील, असा विश्वास आहे. ते ७० टक्के मतांनी निवडून येतील," असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा -

  1. MLA Nilesh Lanke : आमदार निलेश लंकेंचा 'माईंड गेम'; 'तुतारी' वाजवली पण पक्ष प्रवेश नाही, म्हणाले...
  2. BJP Vs Congress : भाजपाचा 'भारत जोडो न्याय यात्रे'ला शह देण्याचा प्रयत्न, पण आम्ही डगमगत नाही - काँग्रेस
  3. Uddhav Thackeray : रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; भाजपावर हल्लाबोल करत म्हणाले, "त्यांचं हिंदुत्व गोमूत्रधारी..."

Last Updated : Mar 14, 2024, 9:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.