ETV Bharat / state

दर्यापुरात राणांचा उमेदवार जिंकणार? महायुतीत गोची तर महाआघाडीत तिढा - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीनं अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर रवी राणा यांनी त्यांच्या युवा स्‍वाभिमान पक्षातून रमेश बुंदिले यांना उमेदवारी जाहीर केलीय.

Ravi Rana Yuva swabhiman paksh candidate Ramesh Bundile Vs Abhijit Adsul In Daryapur Assembly constituency
दर्यापूर विधानसभा मतदारसंघ (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2024, 2:17 PM IST

अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीतल्या 'शिवसेना' पक्षाने अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अडसूळ हे दर्यापूर मतदार संघात काय तर अख्ख्या जिल्ह्यात कुठंही नकोत, अशी आमदार रवी राणा यांची ठाम भूमिका असल्यानं दर्यापूरमध्ये दहा वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईतून आलेल्या अडसुळांविरुद्ध राणांचा उमेदवार निवडणूक जिंकणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी गत निवडणुकीत या मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता. त्यांची भूमिका आता या मतदारसंघात कशी असणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

भाजपाचे माजी आमदार आता राणांचे उमेदवार : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रमेश बुंदिले हे 19 हजार 582 मतांची आघाडी घेऊन दर्यापूरमधून निवडून आलेत. त्यांच्या विरोधात असणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बळवंत वानखडे यांना 44,642 मतं मिळाली होती. तर त्यावेळी मतदारसंघाचे आमदार असणारे शिवसेनेचे अभिजीत अडसूळ यांना केवळ 32 हजार 256 मतं मिळाली. अभिजीत अडसूळ या निवडणुकीत डिपॉझिट देखील वाचवू शकले नाहीत. त्यानंतर आतापर्यंत अडसूळ हे मतदारसंघात फिरकले देखील नाहीत. आता 2019 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोडून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे बळवंत वानखडे यांनी रमेश बुंदिले यांचा पराभव केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बळवंत वानखडे हे अमरावतीत खासदार म्हणून निवडून आले. दरम्यान मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले अभिजीत अडसूळ हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात परतले असून त्यांना महायुतीने उमेदवारी जाहीर केली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून राणा आणि अडसूळ यांच्यात 36 चा आकडा आहे. आता लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात अडसुळांनी अपप्रचार केला, असा आमदार राणा यांचा आरोप आहे. यामुळंच दर्यापूर मतदार संघात भाजपाचे रमेश बुंदिले या माजी आमदारांना भाजपातून आपल्या युवा स्वाभिमान पार्टीत राणांनी आणलं. आता अडसुळांविरुद्ध रमेश बुंदिले यांच्या पाठीशी राणा यांनी भक्कम ताकद उभी करण्याचा निश्चय केला. विशेष म्हणजे मतदार संघात रमेश बुंदिले यांची प्रतिमा अतिशय चांगली असल्यानं अभिजीत अडसूळ यांच्यापेक्षा बुंदिले नक्कीच समोर राहतील, असा राणांना विश्वास आहे. वरिष्ठ पातळीवर दर्यापूरमधील या घडामोडींसंदर्भात ताण-तणाव निर्माण झाले असतानाच आमदार रवी राणा यांनी नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. असं सांगितलं जातंय की, या भेटीत दर्यापूरमध्ये अडसुळांविरुद्ध आपल्या उमेदवारासाठी फडणवीस यांच्याकडून राणांनी ग्रीन सिग्नल मिळवला.

काँग्रेसचा उमेदवार गुलदस्त्यात : खरंतर बळवंत वानखडे हे खासदार म्हणून निवडून येताच दर्यापूर विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोडून काँग्रेसमध्ये आलेले रामेश्वर अभ्यंकर यांना काँग्रेस उमेदवारी देईल, असा सूर मतदारांमध्ये होता. असं असताना गत तीन-चार महिन्यांपासून नागपूर येथील उद्योजक आणि यापूर्वी अमरावती लोकसभा निवडणूक लढवणारे गुणवंत देवपारे यांना काँग्रेस उमेदवारी देईल, अशी चर्चा रंगायला लागली. आज अमरावती जिल्ह्यातील अमरावती अचलपूर धामणगाव रेल्वे अशा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले असताना दर्यापूर मतदार संघातील उमेदवाराची घोषणा अद्याप काँग्रेसनं केली नाही. स्वतः खासदार बळवंत वानखडे हे देखील उमेदवारी कोणाला मिळावी या भानगडी पासून अलिप्तच! आमदार राणांच्या रमेश बुंदिले या तगड्या उमेदवाराला लढत देण्याची क्षमता काँग्रेस मधील रामेश्वर अभ्यंकर यांच्यात असल्याचं बोललं जातं. विजय विल्हेकर या सामाजिक क्षेत्रात एक चांगलं नाव असणाऱ्या व्यक्तीला काँग्रेस उमेदवारी देईल, अशी देखील चर्चा आहे. असं असताना उमेदवारीसाठी सर्व अपेक्षितांना काँग्रेसनं अद्यापही झुलवतच ठेवलंय.

दर्यापूर मतदारसंघ होता शिवसेनेचा गड : दर्यापूर विधानसभा मतदारसंघात 1990 मध्ये प्रकाश भारसाकळे हे शिवसेनेचे आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आलेत. 1990 ते 2005 पर्यंत शिवसेनेचे आमदार म्हणून प्रकाश भारसाकळे यांनी दर्यापूरचं नेतृत्व केलं. या काळात दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जायचा. नारायण राणे समर्थक असणारे प्रकाश भारसाकळे यांनी 2005 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. 2005 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रकाश भारसाकळे विजयी झाले. 2009 मध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानं प्रकाश भारसाकळे यांनी भाजपामध्ये प्रवेश करून लगतच्या अकोला जिल्ह्यातील अकोट मतदार संघात नव्यानं राजकारण सुरू केलं. दरम्यान 2009 मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून अभिजीत अडसूळ हे दर्यापूर मधून विजयी झाले. खरंतर 2009 नंतर दर्यापूरसह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात अतिशय बळकट असणाऱ्या शिवसेनेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली.

'हे' आहेत इच्छुक उमेदवार : या मतदारसंघात काँग्रेसच्या वतीनं रामेश्वर अभ्यंकर, गुणवंत देवपारे, विजय विल्हेकर हे इच्छुक उमेदवार असून बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे सिद्धार्थ वानखडे हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत दर्यापुरातील मतं :

बळवंत वानखडे, काँग्रेस : 87,843
नवनीत राणा, भाजपा : 79,172
दिनेश बुब, प्रहार : 20,962

विधानसभा 2009 चा निकाल :

अभिजीत अडसूळ शिवसेना : 40,606 मतं
बळवंत वानखडे अपक्ष : 25, 948 मतं
रामेश्वर अभ्यंकर रिपाइं : 20, 263 मतं

विधानसभा 2014 चा निकाल :

रमेश बुंदिले, भाजपा : 64,224 मतं
बळवंत वानखडे, रिपाइं : 44,642 मतं
अभिजीत अडसूळ, शिवसेना : 32, 256 मतं

विधानसभा 2019 चा निकाल :

बळवंत वानखडे, काँग्रेस : 95, 889 मतं
रमेश बुंदिले, भाजपा : 65, 370 मतं

हेही वाचा -

  1. नंदुरबारमध्ये चुरशीची लढत, डॉ.विजयकुमार गावित सातव्यांदा गड राखणार? जाणून घ्या राजकीय समीकरण
  2. शेकाप-ठाकरे गटातील द्वंद्वामुळं उरणमध्ये भाजपाला बळ? जाणून घ्या राजकीय समीकरण
  3. विधानसभा निवडणूक 2024; 'या' मतदार संघात प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण यांच्यात थेट लढत ?, जाणून घ्या काय आहेत समीकरणं ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.