ठाणे Raj Thackeray Leg Injured : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी (11 सप्टेंबर) ठाणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते 15 गणेश मंडळांना भेट देणार होते. मात्र, यादरम्यान गाडीतून उतरताना त्यांच्या पायाला दुखापत झाल्यानं त्यांना दौरा थांबवावा लागलाय. शिवाई नगर, पातलीपाडा आणि बाळकुम तसंच वृंदावन सोसायटी या ठिकाणच्या गणेश मंडळांना भेटी दिल्यानंतर ते उथळसर येथे दर्शनाला जात असताना त्यांच्या गुडघ्याला मार लागला. त्यानंतर त्यांनी थेट शासकीय विश्रामगृह गाठलं. त्याच ठिकाणी डॉक्टरांनाही बोलावण्यात आलं. डॉक्टरांच्या पथकानं तपासणी केल्यानंतर राज ठाकरेंनी आपला पुढील दौरा रद्द केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण दौरा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनंही आता ठाण्यातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठीच राज ठाकरे हे बुधवारी ठाण्यात आले होते. ठाण्यात येऊन ते चारही विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायांचं दर्शन घेणार होते. संध्याकाळी राज ठाकरे ठाण्यात आल्यानंतर त्यांनी ठाणे विधानसभा आणि ओवळा-माजिवडा मतदार संघातील गणेश मंडळाना भेटी दिल्या. यामध्ये पातलीपाडा, बाळकूम आणि श्रीरंग सोसायटीमधील गणेश मंडळाना भेटी दिल्यानंतर उथळ सर इथं त्यांचा पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी आपला ताफा थेट शासकीय विश्रामगृहाच्या दिशेनं वळवला.
15 पैकी 6 मंडळांच्या भेटी : शासकीय विश्रामगृहातच हाडांचे स्पेशलिस्ट डॉ. मिलिंद पाटील आणि सुबोध मेहता यांनी राज ठाकरेंची तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्लानं राज ठाकरे यांनी आपला पुढील दौरा थांबवला. त्यामुळं 15 गणेश मंडळापैकी केवळ 6 गणेश मंडळांचीच राज ठाकरे भेट घेऊ शकले. दरम्यान, दौरा सुरु असताना राज ठाकरेंना अचानक झालेल्या या दुखापतीमुळं मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याचं बघायला मिळतंय.
हेही वाचा -
- गर्दी पाहून राज ठाकरे संतापले, मुख्य पदाधिकारी सोडून सर्वांना काढलं सभागृहाबाहेर; पाहा व्हिडिओ - Raj Thackeray News
- आदित्य ठाकरेंच्या विरोधातही देणार उमेदवार; अत्याचार अगोदरही होते, निवडणूक आल्यानं विरोधक सरकारला बदनाम करताय का ?, राज ठाकरेंचा हल्लाबोल - Raj Thackeray Slams MVA Leaders
- राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर कार्यकर्त्यांचा राडा ; विधानसभेच्या उमेदवारीवरुन मनसेच्या दोन गटात तुफान हाणामारी - MNS Activist Dispute In Chandrapur