ETV Bharat / state

एका हाताने टाळी वाजवण्याचा अंध तरुणानं केला पराक्रम, इंडीयाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद - Rahul Petare can clap by one hand

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 6:54 PM IST

Updated : May 30, 2024, 11:05 PM IST

Rahul Petare Can Clap By One Hand : एका हातानं टाळी वाजवता येत नाही, असं पूर्वीपासून म्हटलं जात. मात्र, ही म्हण आता एका अंध तरुणानं खोटी ठरवलीय. अहमदनगर जिल्ह्यातील एक अंध तरुणानं चक्क एका हातानं टाळी वाजवण्याचा विक्रम केलाय.

Rahul Petare
राहुल पेटारे (Reporter ETV Bharat MH)

अहमदनगर Rahul Petare Can Clap By One Hand : 'एका हातानं कधीही टाळी वाजत नाही' अशी एक म्हण आपल्या सर्वांना परिचीत आहे. मात्र, एका हातानं टाळी वाजवणारा एक अवलिया पुढं आला आहे. तो आहे आपल्या महाराष्ट्रातला. मनुष्यामध्ये एखादी कमतरता असली तरी त्यावर मात करण्यासाठी दुसरं काहीतरी दिव्य मिळतं असंही म्हणतात. त्याचाच प्रत्यय या अवलियाच्या माध्यमातून मिळत आहे. जिल्ह्यातील अस्तगावच्या राहुल पेटारेनं एका हातानं टाळी वाजण्याचा पराक्रम केलाय. त्याच्या कलेची दखल घेत जमशेदपूरमधील एका संस्थेनं त्याला प्रमाणपत्र देखील दिलं आहे. राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील राहुल पेटारे हा 23 वर्षीय तरुण दोन्ही डोळ्यानं अंध आहे. या तरुणानं एका हातानं टाळी वाजवण्यासाठी तब्बल बारा वर्ष मेहनत करुन ही कला आत्मसात केलीय. याची नोंद देखील आता इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

एका हाताने टाळी वाजवण्याचा अंध तरुणानं केला पराक्रम (Reporter ETV Bharat MH)

गरीब परिस्थित संघर्ष : जन्मतः अंध असलेल्या राहुल पेटारेनं एका हाताने टाळी वाजवण्याची किमया करून दाखवली आहे. अस्तगाव या छोट्या गावातील बबन पेटारे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. ते जन्मतः अंध आहेत. तर राहुल बरोबर शिक्षण घेत असलेल्या एका मित्राला कोणीही नसल्यानं त्यालाही राहुलच्या घरच्यांनी दत्तक घेतलय. हाताला मिळेल ते काम करणारे बबन पेटारे यांची घरची परिस्थिती अतिशय गरीबीची असतानाही त्यांचा जिद्दीनं सांभाळ करत असल्याचं राहुलची आई मंदा पेटारे यांनी सांगितलंय.

एका हातानं टाळी वाजवायला असा शिकला : श्रीरामपूर येथे शिक्षणासाठी असताना 'राहुल'ला गायनाची आवड होती. तिथचं त्यानं शिक्षक वाणी यांच्याकडून पोवडा गायनाचे धडे घेतले. त्यानंतर राहुलच्या गावात हरिनाम सप्ताहात एक महाराज आले होते. त्यांच्याकडून त्यानं प्रेरणा घेत एका हातानं टाळी वाजवण्याची कला अवगत केली. आपले हात सुरुवातीला खूप दुखायचे. परंतु 12 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आपण एका हातानं टाळी वाजवायला शिकल्याचं राहुलनं 'ईटीव्ही भारतशी' बोलताना सांगितलं. या अनोख्या कलेची दाखल घेत झारखंड राज्यातील जमशेदपूर येथील संस्थेनं इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र दिलं असल्याचं राहुलनं सागितलं. माझ्या या कलेची गिनिजबुकमध्ये देखील नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहे, असं तो म्हणाला. राहुल पुढील शिक्षण अहमदनगरमध्ये घेत असून त्याला जिल्हाधिकारी व्हायचंय, अशा भावना त्यानं व्यक्त केल्या.

Last Updated : May 30, 2024, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.