ETV Bharat / state

खासगी दौऱ्यावर आलेल्या खा. राहुल गांधी यांना महाबळेश्वरकरांनी दिलं 'हे' गिफ्ट, दौऱ्याचं नेमकं कारण काय? - RAHUL GANDHI VISIT MAHABALESHWAR

काँग्रेसचे नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी महाबळेश्वरच्या खासगी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी महाबळेश्वरकरांनी मोठी गर्दी केली होती.

राहुल गांधी, इन्सेटमध्ये रायन बानाजी
राहुल गांधी, इन्सेटमध्ये रायन बानाजी (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2024, 4:06 PM IST

सातारा - काँग्रेसचे नेते, खा. राहुल गांधी हे सोमवारी महाबळेश्वर दौऱ्यावर आले होते. त्यांचा हा दौरा पूर्णपणे खासगी होता. कौटुंबीक मित्राचं निधन झाल्यानं त्यांच्या अंत्यविधीसाठी ते महाबळेश्वरला आले होते. दफन विधी करून ते पुण्याला रवाना झाले. परत जाताना महाबळेश्वरकरांनी त्यांना स्ट्रॉबेरी भेट दिली. महाबळेश्वरकरांच्या या प्रेमानं राहुल गांधी भारावून गेले.

दौऱ्याचं नेमकं कारण काय? - महाबळेश्वरमध्ये वास्तव्यास असणारे मुंबईतील प्रसिध्द नेत्रतज्ज्ञ डॉ. बुर्जोर पी. बानाजी यांचे पुत्र रायन बानाजी हे रग्बी खेळाडू होते. रग्बी स्पर्धेसाठी ते काही दिवसांपूर्वी पोर्तुगालमधील लिस्बनला गेले होते. खेळताना हृदयविकाराच्या झटक्यानं (कार्डियाक ॲटॅक) त्यांचं निधन झालं. सोमवारी (१६ डिसेंबर) त्यांचं पार्थिव महाबळेश्वरमध्ये पोहोचलं. डॉ. बानाजी कुटुंबाशी राहुल गांधींचा कौटुंबिक स्नेह आहे. रायन बानाजी घनिष्ठ मित्र असल्यानं त्यांच्या अंत्यविधीसाठी राहुल गांधी महाबळेश्वरला आले होते.

गांधी-बानाजी कुटुंबात कौटुंबिक स्नेह - डॉ. बुर्जोर बानाजींनी २० वर्षांपूर्वी राहुल गांधींच्या डोळ्यावर उपचार केले होते. तेव्हापासून बानाजी आणि गांधी कुटुंबात स्नेह निर्माण झाला होता. रायन बानाजी यांच्याशी राहुल गांधींची घनिष्ठ घनिष्ठ मैत्री होती. मित्राचं निधन झाल्याचं कळताच कौटुंबिक नात्यानं ते अंत्यविधीसाठी महाबळेश्वरला आले होते. यावेळी कोणीही त्यांना भेटायला येऊ नये, अशी सक्त ताकीद काँग्रेस पदाधिकाऱ्यांना देण्यात आली होती.

पारशी स्मशानभूमीत दफनविधी - महाबळेश्वरातील शापूर हॉल निवासस्थानातून रायन बानाजी यांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेण्यात आलं. खासदार राहुल गांधी पार्थिवासोबत रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत गेले. पारशी समाजाच्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार झाल्यानंतर बानाजींच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबाचं त्यांनी सांत्वन केलं. त्यानंतर दुपारी ते पुण्याला रवाना झाले.

राहुल गांधींसोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड - राहुल गांधींना भेटण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. रस्त्यात वाहनं थांबवून त्यांनी नागरिकांशी हस्तांदोलन केलं. काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांनी राहुल गांधींना महाबळेश्वरची प्रसिध्द स्ट्रॉबेरी भेट दिली. या भेटीनं राहुल गांधी भारावून गेले. ती भेट त्यांनी प्रेमानं स्वीकारली आणि महाबळेश्वरकरांचा निरोप घेतला.

हेही वाचा..

  1. ईव्हीएम विरोधात आंदोलन पेटणार? शरद पवारांनंतर आता राहुल गांधीही मारकडवाडीला जाणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.