ETV Bharat / state

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह आजोबांवर आणखी एक गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? - Pune Porsche car accident - PUNE PORSCHE CAR ACCIDENT

Pune Porsche car accident : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

another case filed against Pune Porche Car Accident minor accused father and grandfather
अल्पवयीन आरोपीच्या वडील आणि आजोबांविरुद्ध चंदननगर पोलिसांत नवा गुन्हा दाखल (Source ETV Bharat)
author img

By PTI

Published : Jun 7, 2024, 10:28 AM IST

Updated : Jun 7, 2024, 11:34 AM IST

पुणे Pune Porsche car accident : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबा यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पिता-पुत्रांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय. चंदननगर पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 जणांवर गुन्हा दाखल : मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथे राहणाऱ्या एका 41 वर्षीय बांधकाम व्यावसायिकानं 9 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. शशिकांत दत्तात्रय कातोरे असं आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचं नाव होतं. सावकारी कर्जाला कंटाळून या व्यावसायिकानं आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता. त्यानंतर दत्तात्रय साहेबराव कातोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना या प्रकरणात पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडील आणि आजोबांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर चंदननगर पोलिसांनी भादंवि 306, 504 आणि 506 नुसार 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय.

काय आहे प्रकरण? : शशिकांत कातोरे यांना व्यवसायासाठी कर्जाची गरज होती. त्यादरम्यान त्यांची ओळख विनय काळे नामक व्यक्तीशी झाली. काळेंनी शशिकांत यांना पाच टक्के व्याजानं परतफेड करण्याच्या अटीवर पैसे दिले. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी शशिकांत यांनी नवीन साइट सुरू करण्यासाठी पुन्हा काळेंकडून कर्ज घेतलं. मात्र, ही साइट सुरु झालीच नाही. त्यानंतर काळेकडून कर्जाच्या रकमेवर चक्रवाढ व्याज लावण्यात आला. पैशांसाठी काळेंनी तगादा लावायला सुरुवात केली, शशिकांत यांच्या घरी जाऊन काळेंनी त्यांना 'पैसे परत दिले नाही तर, तुरुंगात पाठवेन' अशी धमकी दिली. त्यामुळं कंटाळून शशिकांत कातोरे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली होती. तर या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा -

  1. पुणे जिल्ह्यात हिट अँड रनची पुनरावृत्ती, अल्पवयीन मुलीनं दोघांना उडवलं; एकाचा मृत्यू पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप - minor daughter hit two bike riders
  2. मुलाचा 'कार'नामा! वडील, आजोबा अन् आता आई अटकेत; विशाल अग्रवालचा पोलीस पुन्हा घेणार ताबा - Pune Porsche accident case
  3. पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये खासगी व्यक्तींकडून फेरफार, ते चार जण कोण? - Pune Hit And Run Case Update

Last Updated : Jun 7, 2024, 11:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.