पुणे Kamla Nehru Hospital : पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात संशयित बांगलादेशी तरुण असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु हे तरुण बांग्लादेशचे नसून मूळचे बिहारचे असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी याबाबत माहिती दिलीय.
दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात : 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं पुणे पोलिसांनी मंगळवारी तीन संशयित बांगलादेशी तरुणांचे फोटो रुग्णालयाच्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये पाठवले होतं. मात्र आता हे तरूण बांग्लादेशी नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. आज कमला नेहरू रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या दोन संशयिताना लोकांना पुण्यातील फरासखाना पोलिसांनी (Faraskhana police) ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
दोघे पोलिसांच्या ताब्यात : मंगळवारी सकाळी दोन संशयित तरूण हे कमला नेहरू रुग्णालयातील कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तपासणी आले होते. त्यांनी हाडांच्या डॉक्टरांकडे तपासणी केली आणि काही रक्तांच्या चाचण्या देखील केल्या होत्या. आज रक्ताचा रिपोर्ट घेण्यासाठी ते रुग्णालयात आले असता त्यावेळी सुरक्षा रक्षकाकडून त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
रुग्णालय प्रशासनाला पाठवले होते फोटो : कमला नेहरू रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत बोठे म्हणाले की, पोलिसांनी मंगळवारी तीन संशियत लोकांचे फोटो रुग्णालय प्रशासनाला पाठवले होते. हे तीन संशियत बांगलादेशचे असल्याचं संशय व्यक्त केला जात होता. आज सकाळी ते तिघे इथे तपासणीसाठी आले होते. त्यावेळी कर्मचाऱ्याने त्यांना एका रूममध्ये कोंडून ठेवलं. त्यांचे नाव आमच्या रजिस्टरमध्ये आहेत. मंगळवारी देखील ते तिघे या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांनी रक्ताची तपासणी केली आणि हाडांच्या डॉक्टरांना देखील दाखवलं होतं. आज जेव्हा ते रिपोर्ट घेण्यासाठी आले असता तेव्हा त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
हेही वाचा :
Ratnagiri Crime : अतिरेकी कारवाया प्रकरणी रत्नागिरीतून आणखी एकाला अटक