पुणे Pune Mhada Lottery : गेल्या काही वर्षांपासून घरांच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. यामुळं सर्वसामान्यांना घर घेणं अवघड होत आहे. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता सर्वसामान्य लोक म्हाडा आणि सिडकोकडून उपलब्ध होणाऱ्या घरांची आतुरतेनं वाट पाहात असतात. पुण्यात घर घेण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे विभागीय मंडळानं मार्च 2024 मध्ये म्हाडा लॉटरी जाहीर केली होती. याची मुदत 30 मे 2024 रोजी संपली होती. मात्र आता यासाठी अर्ज स्वीकारण्याती तारीख वाढवण्यात आलीय. नवीन तारीख काय आहे? किती घरांसाठी सोडत आहे? याबाबत जाणून घेऊया.
'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार : म्हाडानं मार्च 2024 मध्ये 4877 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. यासाठी अर्ज प्रक्रिया 7 मार्चपासून सुरू झाली होती. ही मुदत 8 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. मात्र म्हाडानं नंतर ही मुदत 30 मे 2024 रोजी रात्री 11:59 पर्यंत वाढवली होती. मात्र आता पुन्हा या मुदतीत वाढ करण्यात आलीय. आता ही मुदत 6 जूनपर्यंत वाढवण्यात आलीय. नागरिकांनी शासकीय कर्मचारी निवडणुकीच्या कामांमध्ये गुंतलेले असल्यानं त्यांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्र मिळण्यास विलंब होत होतोय असं म्हटलं होतं. दरम्यान नागरिकांची हीच मागणी लक्षात घेता पुणे मंडळानं या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतलाय.
ही शेवटची मुदतवाढ : आठ एप्रिल पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र या मुदतीत अनेकांना अर्ज सादर करता आले नाहीत. यामुळे मंडळानं 30 मे पर्यंत मुदत दिली होती. आता म्हाडानं परत एकदा मुदतवाढ दिलीय. मात्र ही अंतिम मुदतवाढ राहणार असून यानंतर नागरिकांना मुदत मिळणार नाही.
हेही वाचा
- मुंबईकरांचे 'मेगा'हाल; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं मध्य रेल्वेचं आवाहन - Central Railway Jumbo Mega Block
- नागपुरात सूर्य ओकतोय आग; गेल्या चार दिवसांत उष्माघातानं १० जणांचा मृत्यू - Nagpur Heat News
- विक्रोळीत म्हाडाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू, मिहीर कोटेचांना नागरिकांचा घेराव - MHADA Building Collapsed