दौंड Pune Drug Case : पुण्याच्या ड्रग प्रकणानंतर कुरकुंभातील ड्रग रॅकेट उघडकीस आलं आहे. दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कुरकुंभ येथील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अनिल साबळे याच्याबाबतही धक्कादायक माहिती पोलिसांना मिळत आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या साबळेला अधिकाऱ्यांनी पकडलं असता तो मर्सिडीजचा मालक असल्याचं समोर आलंय.
काय आहे प्रकरण? : कुरकुंभमध्ये अर्थकॉम लॅबोरेटरीजच्या नावाखाली ड्रग्ज रॅकेट सुरू होतं. त्या कंपनीचा मालक अनिल साबळे असल्याची माहिती समोर येत आहे. साबळे हे मूळचे श्रीगोंदियाचे रहिवासी असून सुमारे 15 वर्षांपासून ते कुरकुंभा एमआयडीसीमध्ये कार्यरत आहेत. मात्र, दुचाकी चालवणारा साबळे हा मर्सिडीजचा मालक असल्याचं समोर आलंय. गुन्हेगारी विश्वातील त्याचा प्रवास धक्कादायक व आश्चर्यकारक आहे. कुरकुंभ एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ए 70 या कंपनीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला. पुणे पोलिसांनी या कंपनीच्या परिसरातून सुमारे 1400 कोटी रुपये किमतीचे 700 किलो मेफेड्रोन ड्रग (एमडी ड्रग) जप्त केलंय.
कुरकुंभ एमआयडीसी बनलं ड्रग निर्मिती केंद्र : कुरकुंभ एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये ड्रग0 निर्मितीची ही तिसरी घटना आहे. साबळे याच्या अर्थकॉम कंपनीवर कारवाई करण्यापूर्वी याच परिसरात असलेल्या समर्थ लॅबोरेटरीज, सुजलाम केमिकल्स या कंपन्यांवरही पोलिसांनी कारवाई केली होती. या कंपन्यांमध्ये ड्रागचा मोठा साठाही आढळून आला होता. कारवाईनंतर समर्थ लॅबोरेटरीज, सुजलाम केमिकल्स या कंपन्यांमध्ये पुन्हा काम सुरू झालं असलं, तरी नेमकं कोणत्या प्रकारचं उत्पादन होत आहे, याची माहिती समोर आलेली नाही. साबळे प्रकरणानंतर आता यासंदर्भातही चौकशीची मागणी होत आहे. कुरकुंभ एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये अशा अनेक संशयास्पद कंपन्या आहेत. रासायनिक कंपन्यांच्या नावाखाली या कंपन्या ड्रग उत्पादन करत असल्याची चर्चा आहे.
- दिल्लीत पुणे पोलिसांची कारवाई : कुरकुंभ एमआयडीसीतील कंपन्यांचं ड्रग थेट दिल्लीत विक्रीसाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी दिल्लीत 1200 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहेत. 3 दिवसांत पुणे पोलिसांनी 4000 कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. त्यामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
ड्रग प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित : 20 फेब्रुवारी रोजी अनिल साबळे यांच्या कंपनीत हा प्रकार समोर आला. पुणे पोलिसांची ही कारवाई 13 तास चालली. साबळे यानं गुन्हेगारी मार्गानं किती संपत्ती जमा केली? साबळे याचे या उद्योगातील इतर भागीदार कोण आहेत? साबळे याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? ललित पाटील यांच्यावर कारवाई होऊनही साबळे यानं मेफेड्रोनची निर्मिती कशी सुरू ठेवली? या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय.
हे वाचलंत का :