ETV Bharat / state

पुणे हिट अँड रन प्रकरण; विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी - Pune Hit And Run Case - PUNE HIT AND RUN CASE

Pune Hit And Run Case: पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर आलीय. अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) आणि वडिल विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Kalyani Nagar Accident News
सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना पोलीस कोठडी (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 5:33 PM IST

पुणे Pune Hit And Run Case : पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल (Surendra Kumar Agarwal) आणि वडील विशाल अगरवाल (Vishal Agarwal) यांना आज न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयानं या दोघांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोघांना अटक झाली होती अटक: कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल आणि वडील विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर सुरेंद्र कुमार यांना न्यायालयात हजर केल्यावर 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. तर वडील विशाल अगरवाल यांना आधीच न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. सोमवारी पुणे पोलिसांनी न्यायालयात अर्ज करत विशाल अगरवाल याचा ताबा घेत आज दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं होत.

तपासासाठी पोलीस कोठडी हवी आहे : आज न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी वकील यांनी दोन्ही आरोपीची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागीतली. तसेच कार चालकाचा फोन हस्तगत करायचा आहे. तसेच त्याचा पुढचा तपास करायचा आहे. या सगळ्यांचा एकत्रित तपास करायचा आहे. त्यासाठी पोलीस कोठडी हवी आहे. तसेच यांना आणखी कोणी मदत केली आहे का? याचा देखील तपास करायाचा आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीमध्ये छेडछाड झालीय ती कोणी केली याचा तपास करायचा आहे. म्हणून पोलीस कोठडी देण्यात यावी असं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर धंगेकर आणि अंधारे यांचा मोर्चा; कार्यालयातच वाचून दाखवली हप्तेखोरीची यादी - Ravindra Dhangekar News
  2. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने डॉक्टरांनी फेकून दिले, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची खळबळजनक माहिती - Porsche car accident case
  3. 'मी' मध्यमवर्गीय असल्यानं माझ्यावर पोर्श कार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, आर्यन नीखराचा आरोप - Pune hit and run case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.