ETV Bharat / state

आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू - Pune Accident News

Pune Accident : पुण्यात आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं असून यातील एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरे गावाजवळ हा अपघात झाला.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 9:32 AM IST

Updated : Jun 23, 2024, 11:34 AM IST

Pune Accident
पुणे अपघात (Source - ETV Bharat)

मंचर खेड Pune Accident : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे येथील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं कारखाली दोघांना चिरडल्याची घटना शनिवार मध्यरात्री घडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरे गावाजवळ अपघात घडल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरे गावाजवळ अपघात (ETV Bharat Reporter)

एकाचा मृत्यू : मंचर पोलिस तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन तणावपूर्ण वातावरणाची परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. ओम भालेराव (वय 19वर्ष) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचं नाव आहे. तर मयुर मोहिते असं आमदार मोहिते यांच्या पुतण्याचं नाव आहे.

असा घडला अपघात ? : मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेनंं येत होता. तो विरुद्ध दिशेनं सुसाट कार चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या कारनं धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकीस्वार हवेत उडाला होता. डोक्याला तसंच छातील मार लागल्यानं अपघातात ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मयुर हा कारमध्येच बसून होता. त्यानं कुठलीही मदत केली नाही. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू : अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं धाव घेत बचावकार्य केलं. अपघातानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी मंचर पोलीस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी त्यांना शांततेचं आवाहन केलं. या अपघात प्रकरणी मयुर मोहिते याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते.

हेही वाचा

  1. राज्यात मान्सूनचा धुमाकूळ; पुढील 5 दिवस महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट - Maharashtra Rain News
  2. ...म्हणून आम्हाला अपेक्षा नाही; लोकसभा उपसभापतीबाबत शरद पवार काय म्हणाले? - Sharad Pawar
  3. 'उपराकार' लक्ष्मण मानेंनी केली उदयनराजे-शिवेंद्रराजेंच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं कारण काय? - Laxman Mane On Udayanraje

Last Updated : Jun 23, 2024, 11:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.