ETV Bharat / state

अंत्यसंस्काराहून परतणाऱ्यांवरच काळाचा घाला; भरधाव ट्रकनं पाच जणांना चिरडलं - Pune Accident News - PUNE ACCIDENT NEWS

Pune Accident : अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एका भरधाव ट्रकनं अंत्यसंस्काराहून परतणाऱ्या अनेकांना चिरडल्यानं हा अपघात झाला आहे.

Pune Accident
भरधाव ट्रकनं पाच जणांना चिरडलं (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 19, 2024, 4:24 PM IST

Updated : Jul 19, 2024, 5:12 PM IST

पुणे Pune Accident : अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकनं अंत्यसंस्काराहून परतणाऱ्या अनेकांना चिरडलं आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अहमदनगरकडून हा ट्रक कल्याणच्या दिशेनं जात होता. ट्रकनं रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुचाकी आणि चारचाकींना धडक दिली. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून हा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.

भरधाव ट्रकनं पाच जणांना चिरडलं (ETV Bharat Reporter)

कसा झाला अपघात : कल्याण-नगर महामार्गावर असलेल्या गुळुंचवाडी गावात अत्यंविधीच्या कार्यक्रमावरुन परतणाऱ्यांना एका भरघाव ट्रकनं उडवल्यानं एकच गोंधळ उडाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. यातील जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अत्यंविधी उकरुन हे नागरिक घरी जात असताना भरधाव ट्रकनं अनेक दुचाकी तसंच चारचाकी वाहनांना धडक दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वर ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गावकऱ्यांचा रास्ता रोको : या अपघाताचं वृत्त समजताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच आपल्या गावातील पाच जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याचं समजताच शेकडोच्या संख्येनं गावकऱ्यांनी महामार्गावर उतरत रास्ता रोको केला. मात्र त्यानंतर पोलिसांबरोबर चर्चा केल्यानंतर रस्ता रिकामा करुन देण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. याठिकाणी बायपास करावा या मागणीकडं प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणाला स्थानिक संतप्त झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहचले असून परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे. मात्र अत्यंविधीवरुन परत जाताना गावातील पाच जणांवर काळानं घाला घातल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

  1. जळगावमध्ये भरधाव कारनं 5 महिला 2 चिमुकल्यांना उडवलं, एक ठार; जमावाकडून कार चालकाला बेदम मारहाण - Jalgaon Accident
  2. भरधाव कार आणि ट्रकची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील सहा जण ठार - Road Accident In Bikaner
  3. पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; जीप विहिरीत कोसळल्यानं सात जणांचा मृत्यू - Jalna Accident

Last Updated : Jul 19, 2024, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.