ETV Bharat / state

महाविकास आघाडी कधीच छत्रपती शिवरायांचा सन्मान करत नाही, देवेंद्र फडवणवीसांचा हल्लाबोल - Devendra Fadnavis On MVA Protest

Devendra Fadnavis On MVA Protest : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रकरणावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. आज महाविकास आघाडीच्या वतीनं या प्रकरणी आंदोलन करण्यात येत आहे. मात्र महाविकास आघाडीचं आंदोलन हा राजकारणाचा भाग असल्याचा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Devendra Fadnavis On MVA Protest
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 12:13 PM IST

Updated : Sep 1, 2024, 1:02 PM IST

मुंबई Devendra Fadnavis On MVA Protest : महाविकास आघाडीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याप्रकरणी मुंबईत सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मात्र महाविकास आघाडी कधीच छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करत नाही. महाविकास आघाडीकडून करण्यात येत असलेलं आंदोलन हा केवळ राजकारणाचा भाग आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

महाविकास आघाडीचं आज गेट वे ऑफ इंडियाजवळ आंदोलन : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात मोठं राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं या प्रकरणी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. आज महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत, वर्षा गायकवाड, खासदार शाहू महाराज, खासदार सुप्रिया सुळे आदी नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. महाविकास आघाडीच्या वतीनं गेट वे ऑफ इंडिया परिसरात मोठी घोषणाबाजी करण्यात आली.

महाविकास आघाडी कधीच शिवरायांचा सन्मान करत नाही : महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईतील गेट वे ऑफ परिसरात आंदोलन करण्यात येत असल्यानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला जोरदार चपराक लगावली आहे. महाविकास आघाडीचं आंदोलन केवळ राजकारणाचा भाग आहे. महाविकास आघाडी कधीच छत्रपती शिवरायांचा सन्मान करत नाही. आज करण्यात येत असलेलं आंदोलन हा देखील केवळ राजकारणाचा दिखावा आहे, असा जोरदार हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हेही वाचा :

  1. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन..."; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना आवाहन - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  2. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना; आशिष शेलारांनी मागितली माफी, तर फडणवीस म्हणाले, "कोथळा बाहेर काढू" - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  3. "...तर मी राजकारणातून संन्यास घेईन", असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस? - Devendra Fadnavis News

Last Updated : Sep 1, 2024, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.