पिंपरी चिंचवड (पुणे) : Maharashtra MSME Defense Expo : इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेनशन सेंटर, मोशी येथे होत असलेल्या 'महाराष्ट्रा डिफेन्स एक्स्पो' या प्रदर्शनात खासगी उद्योग, नवीन स्टार्टअप यांची उत्पादनं, नवसंकल्पना पाहता येणार आहेत. ते पाहण्यसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी, असं आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.
-
#WATCH | Indian Air Force’s Made in India Samar-II and Akash surface-to-air weapon systems showcased at the Maharashtra MSME Defence Expo being held at Pune from February 24-26. The Samar-II system has been developed using the R-27 beyond visual range air-to-air missiles which… pic.twitter.com/xNrl96P0Ro
— ANI (@ANI) February 23, 2024
तीन दिवस प्रदर्शन पाहता येणार : सामंत म्हणाले, 24 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या प्रदर्शनात भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा महत्वाचा सहभाग राहणार आहे. प्रदर्शन (दि .26 फेब्रुवारी)पर्यंत 3 दिवस सुरू राहणार असून, त्यासाठी 20 दालनं तयार करण्यात आली आहेत. तसंच, खुल्या जागेत हेलिकॉप्टर, रणगाडे, जड संरक्षण वाहने, तोफा आदी पाहता येणार आहेत.
तंत्रज्ञान सर्वसामान्यांना अनुभवता येणार : या प्रदर्शनातील विविध सत्रात भारताची संरक्षण सिद्धता, विविध शस्त्रास्त्रांची निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील संधी याविषयी अभियांत्रिकी तसंच अन्य शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळणार असून, सैन्यदलात दाखल होण्याची प्रेरणा मिळेल. याशिवाय या क्षेत्रातील तंत्रज्ञान सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहे, शस्त्रास्त्रांना प्रत्यक्ष स्पर्श करून रोमांचक अनुभव घेता येणार आहे, असंही सामंत म्हणाले आहेत.
संरक्षण सिद्धतेची संकल्पना प्रदर्शित करण्यात येणार : प्रदर्शनातील चार भव्य दालनांना शिवनेरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पन्हाळा असं नाव देण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण सिद्धतेची संकल्पना प्रदर्शित करण्यात येणार आहे, असंही सामंत यांनी सांगितलं आहे. या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या मान्यवरांची उपस्थिती होती : उदय सामंत पुढे म्हणाले, येथे मांडण्यात येत असलेली शस्त्रास्त्रांची पाहणी करून माहिती घेतली. तसंच, प्रदर्शन दालनांना भेट देऊन उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, उपमुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर गणेश निबे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा :
1 गाव तिथं 'कोहिनूर' स्थापन्याचं मनोहर जोशींचं होतं ध्येय; चार विद्यार्थ्यांपासून झाली होती सुरुवात
2 "येणाऱ्या काळात एकट्याची... "; पंकजा मुंडेंचा इशारा कोणाला?
3 येरवडा कारागृह ते आंतरराष्ट्रीय तस्करी; पुणे ड्रग्स प्रकरणाचा प्रवास