ETV Bharat / state

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भयाण वास्तव; रस्त्याअभावी गरोदर महिलेला झोळीतून रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ - Pregnant Women

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 3:55 PM IST

Updated : Jun 27, 2024, 4:43 PM IST

Pregnant Women : स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावात रस्ता नाही. गावात ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्यानं रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाताना बांबूला कपड्याची झोळी करुन न्यावं लागतं. असाच एक प्रकार आता पुन्हा समोर आलाय.

Pregnant Women
रस्त्याअभावी गरोदर महिलेला झोळीतून रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ (ETV Bharat Reporter)

ठाणे Pregnant Women : मुंबईपासून केवळ 89 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही रस्ता नाही. त्यामुळं जंगल, रानावनातून चिखल तुडवत, नाले ओलांडत प्रवास करत या गावातील नागरिकांना मुख्य रस्त्यावर यावं लागतं. विशेष म्हणजे मुरबाड पासून ओजिवले गाव 27 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र आजतगायत गावात ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्यानं रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाताना बांबूला कपड्याची झोळी करुन नेत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात रुग्ण घेऊन जात असतानाच रस्त्यातच रुग्ण दगावलेल्या अनेक घटना घडलेल्या आहेत. अशीच घटना पुन्हा समोर आलीय. 24 वर्षीय गरोदर महिलेला, बांबूला बांधलेल्या कपड्याच्या झोळीतून रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ आल्याचं भयाण वास्तव समोर आलं आहे.

रस्त्याअभावी गरोदर महिलेला झोळीतून रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ (ETV Bharat reporter)

सरपंचाचा सुविधेआभावी मृत्यू : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील पाड्यात रस्ताच नसल्यानं पाड्याकडं कुणी फिरकत नाही. शाळेत जाणारी मुलं शाळा सुरू असताना पावसाळ्याचे चार महिने शिक्षणापासून वंचित राहतात. परिणामी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जातात. तर मुरबाड तालुक्यातील धसईबाजार पेठेलगत असलेल्या ओजिवले गावच्या हद्दीत 16 घर आणि 50 लोकवस्ती असलेल्या या कातकर वाडीचं दुर्दैव काही हटत नाही. 5 ऑगष्ट 2023 ला येथील सरपंच बारकूबाई किसन हिलम यांना सर्पदंश झाल्यानं एक किमी. डोली करुन नेत असता उपचाराला उशिर झाला. त्यात त्यांचा बळी गेला. तर त्याच महिन्यात त्यांचा जावई सुभाष टिकाराम वाघ यांना देखील सर्पदंश झाल्यानं डोली करुन नेताना उशिर झाल्यानं उपचारादरम्यान त्यांचा देखील मृत्यू झाला होता. दोन बळी गेल्यावर तरी या आदिवासी वाडीला रस्ता मिळेल असं गावकऱ्यांना वाटत होतं. मात्र या रस्त्याचं काम कागदावरच राहिलं असताना 24 जून पहाटेच्या सुमारास एका गरोदर महिलेच्या पोटात प्रसूतीकळा येत असल्यानं त्यांना या वाडीतील चार तरुणांनी बांबूला चादर बांधून झोळी करुन सरकारी रुग्णालय गाठलं त्यामुळं वेळेत उपचार मिळाल्यानं आज बाळ-बाळंतीन सुखरुप असल्याचं माजी सरपंच किसन राजाराम हिलम यांनी सांगितलं.

नोत्यांचं गावाकडं दुर्लक्ष : विशेष म्हणजे या गावाला रस्ता नसल्यानं वाहन जात नाही. त्यातच आजच्या कंप्युटर युगातही आजारी रुग्णांला झोळीतून रुग्णालयात नेलं जातं. त्यामुळं अश्म युगात आल्यासारखंच वाटत असल्याचं येथील तरुणांनी म्हटलं आहे. या गावाला वर्षोनुवर्षे रस्ता, पाणी या समस्या भेडसावत आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याचं मुख्यालय असलेल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बहुतांश गाव-पाड्यात आदिवासींच्या नशिबी आलेलं हे वेदनादायक जगणं खरंच व्यथित करणारं आहे. हीच अवस्था जिल्ह्यात अनेक पाड्यांमध्ये आहे. गावांचा विकास झाला, कार्यसम्राट, विकासपुरुष नेते गावांमध्ये पोहोचले. मात्र या अशा 100 ते 125 मतदार असलेल्या आदिवासी बांधवांच्या गावाबाहेरील वाडी पाड्यात जाण्याचा रस्ता त्यांना सापडत नाही. म्हणून विकास झाला तो फक्त तालुक्याच्या लगत असलेल्या गावांचा. ओजिवले गावात रस्ता होण्याबाबत जबाबदार स्थानिक प्रशासनानं तातडीनं कार्यवाही गरजेची आहे. तरच यापुढं एकही रुग्ण रस्त्याअभावी दगावणार नाही. यावर ठोस उपाययोजना करून गावातील रस्ता तयार करुन तो मुख्य रस्त्याला जोडावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. पावसाळी अधिवेशन 2024 : देवेंद्र फडणवीसांसोबत लिफ्टमधून एकत्र प्रवास; उद्धव ठाकरेंनी विधानभवनात दाखवला 'ठाकरी बाणा' - Assembly Monsoon Session 2024
  2. राज्यात पुन्हा ‘डबल इंजिन’चं सरकार येणार”; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती - Chandrashekhar Bawankule
  3. महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा... - Maharashtra Politics

Last Updated : Jun 27, 2024, 4:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.