मुंबई Prasad Lad : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रचार शिगेला पोहोचलेला असताना राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाऊ लागल्या आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईत प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हा कोडगा माणूस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आरोपाला भाजपा नेत्यांकडून सडेतोड उत्तर दिलं जात आहे.
स्वतः आरशात बघा आणि आत्मचिंतन करा : उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना भाजपा आमदार, प्रवक्ते राम कदम म्हणाले आहेत की महाराष्ट्रात एक नंबर आळशी, वसुलीखोर, आपले शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार आणि खासदार हे कोणालाही सोडत नाहीत. या प्रत्येकांकडून वर्षातून तीन वेळा लाखोंची वसुली करतात. अशी व्यक्ती कोण? असा प्रश्न विचारल्यास एकाच व्यक्तीचे नाव पुढे येतं, ते म्हणजे उद्धव ठाकरे. आयत्या पिठावर नागोबा, उद्धव ठाकरे यांचं कर्तुत्व तरी काय? हा प्रश्न खुद्द शरद पवार यांचा आहे. म्हणून तुम्ही कंगना राणावत आणि नवनीत राणा यांना दोष देऊ नका. यांनी तुमची लायकी काढण्या अगोदर शरद पवार तुमची लायकी काढून कधीच मोकळे झाले आहेत. म्हणून ज्या देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात स्वतःच्या कर्तृत्वामुळे देव माणूस म्हणून जी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी स्वतः आरशासमोर उभे रहा. तुम्ही देवेंद्र फडवणीस यांच्या बद्दल बोलण्यापूर्वी स्वतः आरशात बघा आणि आत्मचिंतन करा, असा सल्ला राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत उत्तर देणार : या मुद्द्यावर बोलताना भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. प्रसाद लाड म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. पण ते का बिघडले आहे? याचा शोध लावावा लागेल, असेही लाड म्हणाले आहेत. पुढे प्रसाद लाड म्हणतात की, ठाकरे आडनावाला कधीही न शोभणारी भाषा उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून आदित्य ठाकरे त्याचबरोबर चतुर्वेदी यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या तोंडून अशी आक्षेपार्ह भाषा वापरली जात आहे. तसेच राज्यासहित देशामध्ये ज्यांना मान सन्मान, प्रतिष्ठा व प्रेम आहे अशा राज्याच्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या बद्दल उद्धव ठाकरे अशा खालच्या स्तराच्या भाषेचा वापर करतात हे अत्यंत दुर्दैवी आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असल्या कारणाने आम्ही ती भाषा वापरणार नाही; परंतु वारंवार अशा भाषेचा वापर झाला तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत तुम्हाला उत्तर द्यावे लागेल, असंही प्रसाद लाड म्हणाले आहेत.
हेही वाचा :
- पंतप्रधान पदावरुन संजय राऊत नाना पटोलेंमध्ये जुंपली; राऊत म्हणाले 'उद्धव ठाकरे होऊ शकतात पंतप्रधान पदाचे उमेदवार' - Sanjay Raut Slams Nana Patole
- वऱ्हाडावर काळाचा घाला ; लग्नाहून परतणाऱ्या वाहनाला भरधाव ट्रकची धडक, 9 जण ठार - Accidnt in Jahlawar
- उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; पंतप्रधान मोदी, अमित शाहांनाही घेतलं फैलावर - Lok Sabha Election 2024