ETV Bharat / state

पुण्यातील प्रणव कराड अमेरिकेतून बेपत्ता झाल्याचा कुटुंबीयांचा दावा; आई वडिलांची भावनिक साद - PRANAV KARAD Missing - PRANAV KARAD MISSING

Pranav Karad Missing : पुण्यातील प्रणव कराड (Pranav Karad) नावाचा तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाल्याची (Missing Case) घटना घडली आहे. हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर काम करत होता, अशी माहिती त्याच्या आई वडिलांनी दिली आहे.

Pranav Karad
बेपत्ता प्रणव कराड
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 8:21 PM IST

Updated : Apr 7, 2024, 10:34 PM IST

माहिती देताना प्रतिनिधी

पुणे Pranav Karad Missing : आई मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मुलाच्या अशा हट्टापाई कर्ज घेऊन आई-वडिलांनी मुलाला शिकवून उच्चशिक्षण दिलं. उच्चशिक्षण देत असताना महाविद्यालयातच आलेली प्लेसमेंट घेऊन मुलगा सहा महिन्यांपूर्वी परदेशात गेला. मात्र तीन दिवसांपूर्वी आई वडिलांना तुमचा मुलगा बेपत्ता झाला आहे, असा फोन आल्याचा दावा मुलाच्या आई वडिलांनी केला आहे. प्रणव कराड असं बेपत्ता झाल्याचा दावा करणाऱ्या मुलाचं नाव आहे. प्रणव बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांकडून कंपनीशी संवाद साधल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु, कंपनीनं कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असा आरोप प्रणवच्या आई वडिलांनी केला. यावेळी "मुलाशी कोणताही संवाद होत नसल्यानं माझं मुलगा हवा," अशी आर्त हाक आई-वडील देत आहेत.

प्रणव कराड हा बेपत्ता झाल्याची तक्रार आमच्याकडं दाखल झाली आहे. आमच्याकडून याबाबत योग्य तो तपास करण्यात येणार आहे.- मनोज शेंडगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे पोलीस ठाणे

या प्रकरणात सरकारनं लक्ष घालावं : पुण्यातील शिवणे येथे राहणारा 22 वर्षीय प्रणव कराड (Pranav Karad) हा परदेशातून बेपत्ता झालाय. "कंपनीकडून प्रणवचं शोध कार्य देखील थांबवण्यात आलंय. सरकारनं आता या प्रकरणी लक्ष घालावं," अशी मागणी, आत्ता प्रणवच्या आई वडिलांकडून केली जातं आहे. तर याबाबत वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे म्हणाले की, "आमच्याकडं त्यांचं अर्ज आलेला आहे. आम्ही याबाबत योग्य तपास करण्यात येणार आहे."

दहा दिवसांपूर्वी झाला प्रणव बेपत्ता : "प्रणव हा पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये नॉटिकल सायन्स नावाचा कोर्स करत होता. हा कोर्स झाल्यावर त्याला कॉलेजमध्येच प्लेसमेंट आलं आणि त्याचं सिलेक्शन 'विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड' या कंपनीत झालं. तो अमेरिकेत शिफ्ट डेस्कला काम करू लागला. सहा महिन्यापासून तो या कंपनीमध्ये काम करत होता आणि शिपमधून विविध देशात जात होता. दहा दिवसांपूर्वी तो ऑस्ट्रेलिया ते सिंगापूर असा प्रवास करत असताना प्रणव हा बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली," असा दावा प्रणवच्या आई वडिलांनी केला.

कंपनीकडून समाधानकारक माहिती नाही : यावेळी प्रणवचे वडील गोपाळ कराड म्हणाले की, "आमचं पाच दिवसांपूर्वी प्रणव याच्याशी बोलणं झालं होतं, तो खूप आनंदी होता. नेहमी आम्ही त्याच्याशी बोलत होतो. त्याला कुठलाही दबाव नव्हता किंवा घरुन कुठलंही टेंशन नव्हतं. आतापर्यंत आम्हाला मुंबईतील कंपनीनं कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही. माझा मुलगा मला परत मिळाला पाहिजे. कंपनी कोणतीही माहिती व्यवस्थित देत नाही. आमचं शोधकाम सुरू आहे, असं कंपनी म्हणत आहे. सरकारनं या प्रकरणात लक्ष घालून कंपनीशी बोलावं. प्रणवचा तपास करावा," अशी मागणी त्यांनी केलीय.

हेही वाचा -

  1. शिक्षिकेच्या पर्समधून 35 रुपये गायब; थयथयाट करत विद्यार्थ्यांना मंदिरात नेऊन दिली शपथ
  2. 'गेला आदित्य कुणीकडे?' गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे राजकारणातून गायब, विरोधकांचं टीकास्त्र - Aaditya Thackeray
  3. धक्कादायक! महापालिका अभियंत्याच्या टेबल ड्रॉवरमध्ये सापडलं नोटांचं बंडल; आप' कार्यकर्त्याने केला भांडाफोड

Last Updated : Apr 7, 2024, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.