मुंबई Mahavikas Aghadi Meeting: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपबाबत महाविकास आघाडीची आज (शुक्रवारी) तिसरी बैठक मुंबईत झाली. या बैठकीसाठी (शिवसेना) ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत, काँग्रेसकडून नाना पटोले, राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या पक्षातील नेते उपस्थित होते. या बैठकीत वंचित बहुजन आघाडी देखील सहभागी झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित होते. मात्र, थोड्या वेळानंतर आंबेडकर बैठकीतून निघून गेले. जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीत समान किमान कार्यक्रम राहवा, ही आमची इच्छा आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
मला बाहेर जायचंय म्हणून मी निघालो : महाविकास आघाडीची बैठक सुरळीत सुरू आहे. अर्धवट चर्चा झालेली आहे. बाकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा होणं बाकी आहे. मला बाहेर जायचं असल्यामुळं मी बैठकीतून जात आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तुमचा चेहरा हसरा दिसतोय, बैठकीतून काही समाधानकारक निर्णय झाला का? असा प्रश्न विचारला असता, मी नेहमीच आनंदी असतो, असे वंचितचे अध्यक्ष आंबेडकर म्हणाले. " माझा चेहरा नेहमीच हसरा दिसतो. त्यामुळं माझ्या आनंदी चेहऱ्यावरून तुम्ही कोणताही तर्क काढू नका," असं प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं.
- 'मी' ठेवलेल्या मुद्द्यावर चर्चा : महाविकास आघाडीमध्ये मी काही मुद्दे मांडले होते. त्यावर तिन्ही पक्षाकडून चर्चा सुरू आहे. अजून अंतिम कोणताही निर्णय झाला नाही. मात्र, चर्चा सुरू असून त्यातून योग्य तो मार्ग निघेल, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
मविआची इंडिया आघाडी होऊ नये : पुढं बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीची 'इंडिया आघाडी' होऊ नये, यासाठी आम्ही सगळेच काळजी घेत आहोत. ताकही फुंकून प्यावं लागत आहे. त्यामुळं जसं इंडिया आघाडीत घडलं. तसं महाविकास आघाडीत घडू नये, ही आमची इच्छा आहे. महाविकास आघाडीत किमान समान कार्यक्रम राहावा, ही माझी इच्छा असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सांगितलं.
'इंडिया आघाडी' आता राहिली नाही : 'इंडिया आघाडी' आता राहिलेली नाही. कारण त्यातून नितीश कुमार बाहेर पडलेले आहेत. त्यांनी भाजपासोबत घरोबा केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनीही वेगळा विचार केला आहे. 'आप' पण वेगळ्या वाटेवर जाण्याचा विचार करत आहे. त्यामुळं आता समाजवादी पार्टी बाकी आहे. समाजवादी पार्टीनं 11 जागांची मागणी केली आहे. पण काँग्रेसचे देण्याच्या तयारीत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळं जे इंडिया आघाडीत घडले, तशी अवस्था महाविकास आघाडीची होऊ नये, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हे वाचलंत का :