ETV Bharat / state

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात दाखल - PRAKASH AMBEDKAR

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2024, 6:08 PM IST

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या छातीत दुखत असल्यामुळं त्यांना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असं आवाहन मुलगा सुजात आंबेडकर यांनी केलय.

अँजिओग्राफी करणार : प्रकाश आंबेडकरांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळं त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. डॉक्टरांची मोठी टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. पुढील ३ ते ५ दिवस प्रकाश आंबेडकर डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत.

प्रतिक्रिया देताना सुजात आंबेडकर (ETV Bharat Reporter)

कार्यकर्त्यांना केली विनंती : याबाबत सुजात आंबेडकर म्हणाले की, बुधवारी रात्री प्रकाश आंबेडकर यांना थोडासा त्रास होत असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. डॉक्टराचा रिपोर्ट आल्यावर आम्ही पुढची माहिती देऊ. तसंच कोणीही हॉस्पिटलबाहेर येऊन डॉक्टर आणि सपोर्ट स्टाफ यांना प्रश्न विचारू नका, अशी विनंती सुजात आंबेडकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना केली. तसंच त्यांच्या प्रकृती विषयी वेळोवेळी अपडेट देण्यात येईल असंही सुजात आंबेडकर यांनी सांगितलं.

स्वबळावर लढवणार निवडणूक : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विधानसभेतही वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवत आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती खालावल्यानं पक्षाचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. यामुळं निवडणुकीच्या काळात पक्षाच्या कामात अडथळा येऊ शकतो, असं पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर प्रकाश आंबेडकर लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी पक्षाचे कार्यकर्ते प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा -

  1. प्रकाश आंबेडकर यांचा तिसऱ्या आघाडीत समावेश का झाला नाही? जाणून घ्या, राजकीय कारणे - Tisari Aghadi
  2. आंबेडकरांकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा, यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला मदत नाही - Prakash Ambedkar
  3. निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर यांची मोठी खेळी, तिसरी आघाडी स्थापन करणार? - Prakash Ambedkar On Third Aghadi

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.