मुंबई- खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शिवरायांच्या जिरेटोपावरून झालेल्या वादाबाबत 'एक्स' मीडियात पोस्ट केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, 'हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ.'
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता संतोष शिंदे यांनी राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यांनी म्हटले, "प्रफुल पटेल तुम्ही चूक केली आहे. असा शब्दांचा खेळ करू नका. तुम्हाला मंत्रिपद पाहिजे, या हेतूनं तुम्ही सरकारकडं लांगूलचालन करत आहात. प्रफुल पटेलांनी ट्विट करून दिलगिरीसुद्धा व्यक्त केलेली नाही. ही सत्तेची नशा संभाजी ब्रिगेड उतरवल्याशिवाय राहणार नाही. प्रफुल पटेलांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर तमाम शिवप्रेमीसोबत आंदोलन करणार आहे."
'जिरेटोप' म्हणजे शिवाजी महाराजांचे प्रतीक- इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अप्रत्यक्ष तुलनेवरून प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली. इतिहास अभ्यासक सावंत म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रफुल पटेल यांनी जिरेटोप घालणे आणि नरेंद्र मोदी यांनी तो खूप काळ आपल्या मस्तकावर ठेवणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. मोदी भक्त आणि प्रफुल पटेल हे नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांसोबत करत आहेत का ? यापूर्वी कुठल्याही राजानं महाराजांनी परिधान केलेला जिरेटोप आपल्या मस्तकावर परिधान केलेला नाही. जिरेटोप म्हणजे शिवाजी महाराजांचे प्रतीक आहे."
शिवाजी महाराजांची माफी मागितली पाहिजे- पुढे इतिहास अभ्यासक सावंत म्हणाले, " ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या प्रतीक असणाऱ्या गोष्टीचा उपयोग एका राजकीय व्यक्तीच्या हस्ते पंतप्रधान का असेना यांना परिधान करायला दिला. त्यांनी तो मस्तकावर धारण करण आणि खूप वेळ ठेवणं याचा अर्थ ते स्वतःला ते शिवाजी महाराज समजतात का ? हा एक प्रश्न आहे. पटेल यांनी ताबडतोब तमाम भारतातल्या सगळ्या शिवभक्तांची आणि शिवाजी महाराजांची माफी मागितली पाहिजे."
हेही वाचा-