चंद्रपूर Maha DBT Scholarship : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर शिष्यवृतीच्या 2023-24 या सत्रासाठी नव्यानं अर्ज भरण्याची ऑनलाईन सुविधा बंद करण्यात आली आहे. असं असतानाही 500 अर्ज महाविद्यालयाकडं प्रलंबित आहेत. ही अत्यंत धक्कादायक बाब असून, विद्यार्थी शिष्यवृतीला मुकल्यास महाविद्यालयास जबाबदार धरलं जाणार आहे. तसंच अशा महाविद्यालयांवर कारवाईसुध्दा केली जाणार आहे, असं समाजकल्याण विभागानं स्पष्ट केलं.
महाविद्यालयांमधील प्रलंबित अर्ज : प्रलंबित अर्ज असलेल्या महाविद्यालयांमध्ये हिस्लॉप ज्यु.कॉलेज, नगीनाबाग- चंद्रपूर 8 अर्ज प्रलंबित, सम्राट अशोक ज्यु.कॉलेज-चिचपल्ली- 8 अर्ज, नवजीवन नर्सिंग स्कुल-चंद्रपूर- 14 अर्ज, मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग घोडपेठ - 16 अर्ज, मीराबाई कांबळे नर्सिंग कॉलेज ब्रम्हपूरी- 78 अर्ज, आर्ट, कॉमर्स कॉलेज-गोंडपिपरी- 6 अर्ज, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी- बेटाळा - 31 अर्ज, गव्हर्नमेंट आयटीआय-ब्रम्हपूरी - 9 अर्ज, महिला बीएड कॉलेज-चंद्रपूर - 8 अर्ज प्रलंबित आहेत.
यांना मिळतो मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून संयुक्तपणे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीप्रदान केली जाते. शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकाचं किंवा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाख ते चार लाखापर्यंत असावं. विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जातो. तसंच परीक्षा फी, ट्युशन फी आणि महाविद्यालयाची शासन मान्य असलेली इतर फी सरकारला मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेकडून मिळते. महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्यासाठी वेळेावेळी मुदतवाढ देण्यात आली. आता 2023-24 मधील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता अंतिम मुदतवाढ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रलंबित अर्ज महाविद्यालयास सादर करण्यासाठी 20 ऑगस्ट ही मुदत आहे, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी दिली.
हेही वाचा