ETV Bharat / state

रामदास तडस यांच्यावर सून पूजा तडस यांची मारहाणीसह आरोपांची सरबत्ती, तडस यांनी सर्व आरोप फेटाळले - Pooja Tadas On Ramdas Tadas - POOJA TADAS ON RAMDAS TADAS

Pooja Tadas On Ramdas Tadas : उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी वर्धेचे खासदार आणि भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनीही मारहाणीसह इतर आरोप त्यांच्यावर केलेत. पूजा तडस सध्या रामदास तडस यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. रामदास तडस यांनी सर्व आरोप फेटाळलेत.

Sushma Andhare On Ramdas Tadas
सुषमा अंधारे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 4:33 PM IST

Updated : Apr 11, 2024, 5:34 PM IST

रामदास तडस यांच्यावर आरोप करताना सुषमा अंधारे

नागपूर Pooja Tadas On Ramdas Tadas : भाजपा उमेदवार रामदास तडस यांनी स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी पूजा यांचे लग्न पंकजसोबत लावून दिले होते, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. पूजा आणि पंकजला राहण्यासाठी रामदास तडस यांनी एक फ्लॅट घेऊन दिला; मात्र त्यानंतर तो फ्लॅट विकून टाकला. पूजाला मानसिक त्रास देण्यात आला. त्यामुळे ती निराश झाली होती. ज्यावेळी पूजा मला भेटायला आली तेव्हा ती आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहचली होती, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे : पंतप्रधान नरेंद्र मोदी असं सांगत आहेत की, पूर्ण देश मोदी का परिवार है. मोदी की गॅरंटी आहे. मोदी यांचा परिवार कुठे आहे आम्हाला उत्तर हवं आहे. ऑलम्पिकमध्ये खेळणाऱ्या आणि देशासाठी सुवर्णपदक मिळवणाऱ्या मोदींच्या परिवारात नाहीत का? उन्नाव काठवा बलात्कार पीडित त्यांच्या कुटुंबात येत नाही का? खासदार रामदास तडस यांची सून त्यांचा कुटुंबात येत नाही का? समृद्धी मार्गावर झालेल्या अपघातात जीव गमावणारे त्यांच्या कुटुंबात येत नाहीत का? पूजा तडस आत्मसन्मानाची लढाई लढत आहे. पूजा तडस यांचा आताचे भाजपाचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या मुलाशी विवाह कोणत्या परिस्थितीत झाला? मुलावर बलात्काराच्या गुन्ह्याची कारवाई टाळण्यासाठी खासदार साहेबांच्या सुपुत्राचा विवाह लावून दिला; पण त्या मुलीचं पुढे काय झालं? याचं उत्तर कोण देईल? गरोदरपणातही तिच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. बाळ जन्माला आल्यानंतर दोन महिने ती वाट बघते. त्यानंतर ती खासदार रामदास तडस यांना कल्पना देते की, अहो मला बाळ झालं आहे. तेव्हा रामदास तडस तिच्या बाळाच्या बापाचे पुरावे मागतात. या गोष्टी फार वाईट आहेत.

काय म्हणाल्या पूजा तडस : स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठीच फक्त माझ्याशी लग्न लावून दिलं. मला एका फ्लॅटमध्ये ठेवलं होतं. माझा उपभोगण्याची वस्तू म्हणून वापर केला गेला. त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर हे बाळ कुणाचं आहे? या बाळाचा डीएनए करा म्हणून माझ्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले. समाजातल्या मुलींनी कुठे जायचं? स्वतःच्या मुलाचं माझ्याशी लग्न लावून तर दिलं; पण मला प्रत्येक वेळी अपमानास्पद वागणूक दिली. प्रत्येक वेळी माझ्यावर घाणेरडे आरोप केले गेले. मी त्यांच्या घरी गेले तेव्हा लोखंडी रॉडने मारहाण केली. छोट्याशा बाळाला घेऊन फ्लॅटवर राहात होते, तो फ्लॅटही विकून आम्हाला रस्त्यावर आणलं. इतक्या खालच्या पातळीपर्यंत राजकारण करत आहेत. मोदी म्हणतात की, देश माझा परिवार आहे. खासदार रामदास तडस त्यांच्या प्रचार सभेसाठी 20 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धेमध्ये येणार आहेत. तेव्हा मला त्यांना एकच विनंती करायची आहे की, मी तुमच्या परिवारातील लेक पूजा तुमच्याकडे न्याय मागते. माझ्या बाळाला न्याय द्या. माझ्या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.

रामदास तडस यांचं स्पष्टीकरण : उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांबद्दल रामदास तडस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित प्रकरण दोन वर्ष जुनं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण उकरून काढलं जात आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असं म्हणत रामदास तडस यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

हेही वाचा:

  1. लोकसभा निवडणूक 2024 : बसपा प्रमुख मायावती आज नागपुरात घेणार सभा, लोकसभा निवडणूक प्रचाराचा उडवणार 'धुरळा' - Lok Sabha Election 2024
  2. आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांकडून अटक; काय आहे प्रकरण? - HARDIK PANDYA News
  3. "मला मूर्ख समजू नका, मी जेवढे सांगायचे तेवढं सांगितलेलं आहे"; उपमुख्यमंत्री अजित पवार असं का म्हणाले? - AJIT PAWAR

Last Updated : Apr 11, 2024, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.