ETV Bharat / state

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी चौकशी सुरू - Jarandeshwar Sugar Factory Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 4:33 PM IST

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा एकदा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांच्या महाराष्ट्रातील टप्पे संपताच अजित पवार यांची चौकशी सुरू झाल्यानं राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही चौकशी अजित पवारांवर दबाव निर्माण करण्यासाठी केली जात आहे, असा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. तर, यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय.

Deputy Chief Minister Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV Bharat MH Desk)

मुंबई Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आली आहे. महायुती सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी किरीट सोमैया यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार यांच्या या प्रकरणाची चौकशी थांबली होती. राज्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदान संपताच पवार यांची चौकशी सुरू करण्यात आली. राज्याच्या माजी सहकार मंत्री शालिनीताई पाटील यांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेतली होती. आता पुन्हा एकदा ही चौकशी सुरू झाल्यानं राजकीय वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बार्गेनिंग पॉवर कमी करावी, त्यांच्यावर असलेला अंकुश कायम राहावा यासाठीचा हा प्रयत्न आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

धनंजय शिंदे, सुरज चव्हाण यांची प्रतिक्रिया (Reporter ETV Bharat MH Desk)

राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न : यासंदर्भात आम आदमी पक्षाचे राज्य सचिव ॲड. धनंजय शिंदे यांनी त्यांच मत व्यक्त केलंय. 'लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा पाचवा टप्पा 20 मे रोजी पार पडलाय. या पाच टप्प्यांमध्ये इंडिया आघाडीला महाराष्ट्रात 48 पैकी 35 ते 40 जागा मिळतील, असा दावा शिंदे यांनी व्यक्त केलाय. तसंच सध्या उत्तर भारतात इंडिया आघाडीला पोषक वातावरण असल्यामुळं 4 जून रोजी निकालामध्ये इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी सगळीकडे चर्चा असल्याचं धनंजय शिंदे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांविरोधात भाजपाची खेळी : राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अंतर्गत मतभेद आहेत. परंतु स्वार्थासाठी हे सर्वजण एकत्र आले आहेत. कालच अजित पवारांसह त्यांच्या पत्नीची जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी काल विधानसभेसाठी आम्हाला 80 ते 90 जागा मिळाल्या पाहिजेत, असं वक्तव्य केलय. त्यामुळं महायुतीत प्रादेशिक पक्षांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय का, असा प्रश्न निर्माण होत आहे. असं झाल्यास महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा कोसळू शकतं. म्हणून अजित पवारांना वचक बसवावा म्हणून भाजपानं खेळी सुरू केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसला फरक पडत नाही : यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण म्हणाले, जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी यापूर्वी अजित पवार यांना क्लीन चीट मिळाली आहे. परंतु आमचे विरोधकांचं आमच्यावरचं प्रेम कमी होताना दिसत नाही. काहीही झालं, तरी या प्रकरणांमध्ये काहीही निघणार नाही. त्यामुळं आम्हाला घाबरण्याचं कारण नाही. या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणी दबाव आणत असेल, असं मला वाटत नाही. परंतु तसा प्रयत्न केल्यास आम्ही दबावाला भीक घालत नाही, असंही सुरज चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

हे वाचलंत का :

  1. ''मोदींचा पराभव व्हावा ही प्रत्येक पाकिस्तानीची इच्छा...''; पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी राहुल गांधींबाबत काय म्हटलं? - Lok Sabha Elections 2024
  2. सावरकरांवरील आक्षेपार्ह वक्तव्य राहुल गांधींना भोवणार? पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली महत्त्वाची माहिती - RAHUL GANDHI News
  3. 'मला मृत्यूचा व्यापारी, घाणेरड्या नाल्यातला किडा...; पंतप्रधान मोदी विरोधकांवर संतापले! - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.