ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2024 : राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष अटळ, पण अद्याप काका पुतण्याचा सावध पवित्रा - Sharad Pawar vs Ajit Pawar - SHARAD PAWAR VS AJIT PAWAR

Sharad Pawar vs Ajit Pawar : लोकसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जास्त जागा लढवल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी असा काका पुतण्याच्या पक्षातील संघर्ष उफाळून आला नाही. मात्र विधानसभेत हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sharad Pawar vs Ajit Pawar
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 20, 2024, 11:15 AM IST

मुंबई Sharad Pawar vs Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना उबाठा पक्षाला नऊ जागा तर शिवसेना शिंदे पक्षाला सात जागा मिळाल्या. मात्र राज्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं फारशा जागा लढवल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष लोकसभेत पाहायला मिळाला नव्हता. मात्र आता विधानसभेत याबाबतचा संघर्ष निश्चित पाहायला मिळणार आहे. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसनं 2019 मध्ये 55 जागांवर विजय मिळवला. या जागांवर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं जर दावा सांगितला, तर निश्चितच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना किमान 55 मतदार संघांमध्ये पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडं कोणते आहेत मतदारसंघ? : राष्ट्रवादी काँग्रेसकडं सध्या 55 मतदार संघ आहेत. यापैकी 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या 55 जागांवर दावा करत आहे. यामध्ये अमळनेर, सिंदखेड राजा, काटोल, तुमसर, अर्जुनी, मोरगाव, अहेरी, पुसद, वसमत, घनसावंगी, कळवण, येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी, देवळाली विक्रमगड, शहापूर, मुंब्रा कळवा, अनुशक्ती नगर, श्रीवर्धन, जुन्नर आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर इंदापूर, बारामती, मावळ, पिंपरी, वडगाव शेरी, हडपसर, अकोले, कोपरगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर, कर्जत जामखेड, माजलगाव, बीड, आष्टी, परळी, अहमदपूर, उदगीर, माढा, मोहोळ, पंढरपूर, फलटण, वाई, कराड उत्तर, चिपळूण, चंदगड, कागल, इस्लामपूर, शिराळा आणि तासगाव कवठे महांकाळ.

अद्याप निर्णय नाही - सुनिल तटकरे : यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, "कोणी कोणत्या मतदार संघात लढायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून ज्या जागा आम्ही जिंकलो आहोत, त्या जागांवर आमचा दावा आहेच. आम्ही महायुतीचा घटक पक्ष आहोत. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र बसू आणि कोणत्या मतदारसंघातून उमेदवार उभे करायचे याचा निर्णय घेऊ. मात्र याबाबत अद्याप फार काही निश्चित नाही," असंही तटकरे म्हणाले.

याबाबत पक्ष निर्णय घेईल - सुप्रिया सुळे : "विधानसभा निवडणुकांचं जागावाटप अद्याप ठरलेलं नाही. महाविकास आघाडीमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. जे मतदार संघ आमच्याकडं आहेत, त्याबाबत निश्चितच आमचा दावा राहील. मात्र अंतिम निर्णय हा महाविकास आघाडीच्या बैठकीतच होईल. त्यानंतरच याबाबतची स्पष्टता होईल, सध्या याबाबत काही सांगू शकत नाही," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

  1. खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, चिन्ह आणि नावाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी - NCP Party Symbol
  2. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काकांसोबत पॅचअप होणार का? अजित पवारांनी दोन शब्दात संपवला विषय! - AJIT PAWAR NEWS

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.