सातारा - पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या तपासणीत १ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील शेंद्रे याठिकाणी क्रेटा कारमध्ये ही रोकड सापडली आहे. महामार्ग पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली आहे. ही रोकड नेमकी कुणाची? याचा पोलीस तपास करत आहेत.
महामार्गावर वाहनांची कसून तपासणी - पुणे-बंगळुरू महामार्गावरील आनेवाडी, शेंद्रे, तासवडे याठिकाणी पोलीस आणि निवडणूक शाखेच्या भरारी पथकाकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली जात आहे. मंगळवारी (५ नोव्हेंबर) दुपारी शेंद्रे याठिकाणी वाहनांची तपासणी सुरू असताना क्रेटा कारमध्ये तब्बल १ कोटीची रोकड सापडली. पोलिसांनी ती रक्कम जप्त करून तपास सुरू केला आहे.
सातारा पोलिसांनी क्रेटा वाहनातून (क्र. एम. एच. 48 सी. टी. 5239) एक करोड रुपयांची रोकड जप्त करून राजस्थानातील दोन तरूणांना ताब्यात घेतलं आहे. दोन्ही तरूणांकडे चौकशी केली असता मुंबईहून कोल्हापूरला रक्कम नेत असल्याचे सांगितले त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. कार मालकाचे नाव मुकेश कस्तुरचंद्र देवरा, (रा. गोकुळ प्लाझा, बॉईज विरार वेस्ट पालघर) आहे. सातारा ग्रामीण पोलीस जप्त रकमेचा तपास करीत आहेत.
यापूर्वी सातारा जिल्ह्यात सापडली होती कोट्यवधी रुपयांची मालमत्ता
- तासवडे टोलनाक्यावरही सापडलं होतं घबाड- पुणे-बंगळुरू महामार्गावरील तासवडे (ता. कराड) टोलनाक्यावर २७ ऑक्टोबर रोजी रात्री पोलिसांनी कारमधून ७ कोटी ५३ लाख रूपये किंमतीचं ९ किलो सोनं आणि ६० किलो चांदी जप्त केली होती. त्या अगोदर दोनच दिवसांपूर्वी गुजरात पासिंगच्या बोलेरो गाडीतूनही १५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती.
- आनेवाडी टोलनाक्यावरही ३४ लाखांचं सोनं जप्त- दिवाळीच्या दोन दिवस आधी साताऱ्याजवळच्या आनेवाडी टोलनाक्यावर तहसीलदारांच्या पथकाने एका वाहनातून ३४ लाखांचं सोनं जप्त केलं होतं. नाकाबंदीवेळी एका वाहनाची कसून झडती घेताना एका वाहनात हा ऐवज सापडला होता. आतापर्यंत सातारा जिल्ह्यात चार कारवायामध्ये कोट्यवधींची रोकड आणि सोनं-चांदी जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा-